अक्कलकोटमध्ये चार, कुंभारीत तीन तर बार्शीत दोन नवे कोरोना बाधित 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जून 2020

तालुकानिहाय बाधितांची संख्या 
अक्कलकोट-21, बार्शी-22, करमाळा-0, माढा-7, माळशिरस-4, मंगळवेढा-0, मोहोळ-5, उत्तर सोलापूर-11, पंढरपूर-7, सांगोला-3, दक्षिण सोलापूर-68, एकूण-148. 

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. आज दुपारी चार वाजता आलेल्या अहवालामध्ये अक्कलकोट तालुक्‍यात चार, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील कुंभारीत तीन तर बार्शीमध्ये दोन नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या 148 एवढी झाली आहे. 

अक्कलकोट तालुक्‍यातील मैंदर्गी येथे एक पुरुष व एक स्त्री, म्हाडा कॉलनी अक्कलकोट येथे एक स्त्री, पिरजादे प्लॉट अक्कलकोट येथे एक पुरुष, अश्‍विनी वैद्यकीय महाविद्यालय कुंभारी येथील क्वार्टर्समध्ये दोन पुरुष, कुंभारी गावात एक स्त्री तर बगले बरड, सोलापूर रोड बार्शी येथे दोन पुरुषांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आज एकूण नऊ जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये काही रुग्ण संपर्कातील तर काही सारीचेही आहेत. अद्यापही 28 जणांचे अहवाल प्राप्त झालेले नाहीत. आज 92 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 83 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले तर नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अद्यापही दवाखान्यात 71 जण उपचार घेत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे मागील दोन दिवसात एकही व्यक्ती मृत झालेली नाही. मृतांची एकूण संख्या 11 एवढी कायम आहे. रुग्णालयातून बरे होऊन 66 जण घरी गेले आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four new corona in Akkalkot, three in Kumbhari and two in Barshi