माजी उपमहापौरांच्या प्रभागात उरले चार रुग्ण ! प्रभागातील 44 नगरांमध्ये घेतले आरोग्य शिबिरे 

तात्या लांडगे
Saturday, 7 November 2020

प्रभागाविषयक ठळक बाबी... 

 • आतापर्यंत आढळले 221 रुग्ण 
 • एकूण रुग्णांपैकी 15 जणांचा मृत्यू 
 • 202 रुग्णांची कोरोनावर मात 
 • आता उरले अवघे चार रुग्ण 

सोलापूर : शहरातील सुनिल नगर, आकाशवाणी रोड, अक्कलकोट रोड, कुंभारीपर्यंत विस्तार असलेला प्रभाग बारा. तर 70 फूट रोड, विजय नगर, कलावती नगर, आशा नगर, शिवगंगा नगर, कामगार वसाहत, वज्रेश्‍वरी नगर, जिवन नगर अशी 44 नगरे असलेल्या प्रभागात सर्वाधिक कामगार लोक राहतात. माजी उपमहापौर शशिकला बत्तुल यांच्या या प्रभागात कोरोना वाढण्याची भिती होती. मात्र, आतापर्यंत येथे 221 रुग्ण आढळले असून त्यापैकी 15 जणांचा मृत्यू झाला. तर 202 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आता या प्रभागात अवघे चार रुग्ण उपचार घेत आहेत. 

प्रभागाविषयक ठळक बाबी... 

 • आतापर्यंत आढळले 221 रुग्ण 
 • एकूण रुग्णांपैकी 15 जणांचा मृत्यू 
 • 202 रुग्णांची कोरोनावर मात 
 • आता उरले अवघे चार रुग्ण 

शहरात नोव्हेंबरमध्ये एकूण टेस्टिंगच्या तुलनेत रुग्णांचा दर 2.54 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. तर मृत्यूचा दर त्याहून अधिक असून तो 4.27 टक्‍के आहे. प्रभाग 19 हा कोरोनामुक्‍त होणारा पहिला प्रभाग ठरला असून त्याठिकाणी शनिवारी (ता. 7) एकही रुग्ण आढळलेला नाही. दरम्यान, शहरात सद्यस्थितीत 378 ऍक्‍टिव्ह रुग्ण असून 16 प्रभाग ऑरेंज झोनमध्ये आहेत. चिंतेची बाब म्हणजे शहरात आतापर्यंत झालेल्या मृतांमध्ये 51 वर्षांवरील 460 रुग्णांचा समावेश आहे. या पार्श्‍वभूमीवर आपल्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिक कोरोनाचे बळी ठरू नयेत, त्यांच्यावर तत्काळ उपचार व्हावेत, या हेतूने नगरसेविका तथा माजी उपमहापौर शशिकला बत्तूल, देवी झाडबुके, नगरसेवक डॉ. राजेश अनगिरे व विनायक कोंड्याल यांनी आपापल्या भागाची खबरदारी घेतली. त्यामुळे आता हा प्रभाग कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर उभा आहे. 

  लोक घराबाहेर पडू नयेत म्हणून गरजूंना दिले धान्य 
  प्रभागात सर्वाधिक कामगार लोक राहतात, गरजूंना धान्य वाटप केले. कोरोना काळात त्यांचे कुटूंब सुरक्षित राहावे, या हेतूने घरोघरी जाऊन जनजागृतीवर भर दिला. त्यानंतर मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले. पोलिस व प्रभागातील स्वयंसेवकांच्या (कोरोना योध्दा) माध्यमातून लोकांवर वॉच ठेवला. आरोग्य शिबिरे घेतल्याने प्रभागातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला नाही. 
  - शशिकला बत्तुल, नगरसेविका 

  संशयितांसह को-मॉर्बिड रुग्णांवर ठेवला वॉच 
  आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनातून नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील 44 पैकी बहुतांश नगरांमध्ये आरोग्य शिबिरे घेतली. त्यानंतर संशयितांची रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट केल्याने संशयितांवर तत्काळ उपचार करता आले. आता प्रभागातील बहुतांश भाग कोरोनामुक्‍त झाला आहे. लोक नियमांचे पालन करु लागल्याने प्रभाग कोरोनामुक्‍त होईल. 
  - डॉ. राजेश अनगिरे, नगरसेवक 


  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: Four patients left in former deputy mayor's ward! Health camps conducted in 44 towns in the ward