
सोशल मीडियाच्या माध्यमातून दुचाकी गाडी खरेदी करण्यासाठी लातूरहून आलेल्या चारजणांना गाडीची कागदपत्र देतो म्हणून निर्जनस्थळी घेऊन जावून मोबाईल, रोख रक्कम, घड्याळ असा एक लाख दहा हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना मंगळवारी (ता. 27) सायंकाळी सहाच्या दरम्यान पिपळखंटे (ता. माढा) ते वडाचीवाडी या दरम्यान घडली. या घटनेचीची फिर्याद देविदास आत्माराम ढमाले (वय 29, रा. आर्वी, ता. जि. लातूर) यांनी कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात दिली आहे.
कुर्डू (ता. माढा, जि. सोलापूर) : सोशल मीडियाच्या माध्यमातून दुचाकी गाडी खरेदी करण्यासाठी लातूरहून आलेल्या चारजणांना गाडीची कागदपत्र देतो म्हणून निर्जनस्थळी घेऊन जावून मोबाईल, रोख रक्कम, घड्याळ असा एक लाख दहा हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना मंगळवारी (ता. 27) सायंकाळी सहाच्या दरम्यान पिपळखंटे (ता. माढा) ते वडाचीवाडी या दरम्यान घडली. या घटनेचीची फिर्याद देविदास आत्माराम ढमाले (वय 29, रा. आर्वी, ता. जि. लातूर) यांनी कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात दिली आहे.
फिर्यादीचा मित्र विशाल वाघमारे याला दुचाकी घ्यायची आहे, असे सांगितले होते. त्यामुळे फिर्यादी यांनी फेसबुकच्या मार्केट प्लस या पेजवरुन पंढरपूर येथे गाडी विक्रीसाठी असल्याचे समजले व मेसेज करुन गाडी विकणाऱ्या विक्रेत्याचा मोबाईल नंबर मिळवला व गाडी संदर्भात बोलणे झाले. पंढरपूर आम्हाला लांब होत आहे, तुम्ही कुर्डूवाडीला या असे सांगून गाडी खरेदीसाठी फिर्यादीसह ज्ञानेश्वर नवनाथ साळुंखे, संकेत दशरथ शिंदे, विजय बाबुराव वाघमारे हे चारजण मित्रांच्या चारचाकी गाडीतून मंगळवारी सायंकाळी पाच वाजता कुर्डूवाडी येथे आले. त्यांनी गाडी विक्रेत्याला फोन करून पिंपळखुंटे (ता. माढा) येथे बोलावले. विक्रेत्यानी एमएच 13/डीके 7844 या क्रमाकांची दुचाकी दाखवली व व्यवहाराबाबत बोलणे केले. त्यानंतर माझे घर येथून जवळ आहे, चला तुम्हाला कागदपत्रे देतो, असे म्हणून त्यांना कच्या रोडने घेऊन गेले. केळीच्या बागेजवळ साडेपाच वाजता ओळखी दोन इसमजवळ थांबलेले होते. त्यावेळी गाडीसाठी पैसे आणले का, असे विचारले असता गाडीची कागदपत्र दाखवा मग पैसे देतो, असे म्हणत गाडी विक्रेत्या व्यक्तीने चाकूचा धाक दाखवून त्या चौघांकडे असणारी रोख रक्कम, मोबाईल, घड्याळ असा एक लाख दहा हजार 300 रुपये किमतीचा ऐवज घेऊन मारहाण केली व दम देऊन निघून जा असे सांगितले. घाबरुन मित्र व नातेवाईक यांच्या मदतीने कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात त्या तीन व्यक्तींचे वर्णन सांगून फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अनोळखी चोरट्यां विरुद्ध कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे हे तपास करत आहेत.
संपादन : वैभव गाढवे