शहरातील चार हजार 400 रुग्णांची कोरोनावर मात! आज 46 पॉझिटिव्ह अन्‌ दोघांचा मृत्यू 

तात्या लांडगे
Friday, 14 August 2020

ठळक बाबी... 

 • आतापर्यंत शहरातील 43 हजार 772 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
 • शहरातील पाच हजार 689 व्यक्‍तींना कोरोनाची बाधा; 387 जणांचा मृत्यू 
 • आतापर्यंत चार हजार 400 रुग्णांची कोरोनावर यशस्वीपणे मात 
 • शेळगी रोड परिसरातील (भवानी पेठ) 98 वर्षीय, मंगळवार पेठेतील 78 वर्षीय रुग्णाचा मृत्यू 
 • आज 45 रुग्णांना सोडले घरी; दोन हजार 216 पैकी 45 व्यक्‍तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह 

सोलापूर : शहरातील दोन हजार 216 जणांपैकी 45 व्यक्‍तींचे रिपोर्ट शुक्रवारी (ता. 14) कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर दोन व्यक्‍तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता शहरातील एकूण रुग्णसंख्या साडेपाच हजारांहून अधिक झाली असून मृतांची संख्या 387 झाली आहे. 

पुना नाका, सोरेगाव, उत्तर कसबा, भूषण नगर, हरिपदम रेसिडेन्सी, प्रभाकर सोसायटी महेश कॉलनी (सम्राट चौक), रेणूका नगर, इंडियन मॉडेल शाळेजवळ, संतोष नगर, भाग्यलक्ष्मी नगर (जुळे सोलापूर), गांधी नगर (अक्‍कलकोट रोड), आदर्श नगर, लक्ष्मी चाळ (दमाणी नगर), प्रताप नगर, महालक्ष्मी नगर, निर्मिती विहार (विजयपूर रोड), उमा नगरी, श्रीदेवी नगर भाग क्र-एक, भवानी पेठ, अभिमान नगर, रेल्वे लाईन, पांढरे वस्ती (कारंबा नाका), नाथ रेसिडेन्सी (भवानी पेठ), निलम नगर, सिध्देश्‍वर नगर (एमआयडीसी), स्मृती अपार्टमेंट (मुरारजी पेठ), समर्थ सोसायटी, गणेश बिल्डर्स (होटगी रोड), बेडर पूल (लष्कर), रोहिणी नगर (सैफूल), स्वामी विवेकानंद नगर (हत्तुरे वस्ती), गोंधळे गल्ली (विजापूर नाका) येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे. 

 

ठळक बाबी... 

 • आतापर्यंत शहरातील 43 हजार 772 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
 • शहरातील पाच हजार 689 व्यक्‍तींना कोरोनाची बाधा; 387 जणांचा मृत्यू 
 • आतापर्यंत चार हजार 400 रुग्णांची कोरोनावर यशस्वीपणे मात 
 • शेळगी रोड परिसरातील (भवानी पेठ) 98 वर्षीय, मंगळवार पेठेतील 78 वर्षीय रुग्णाचा मृत्यू 
 • आज 45 रुग्णांना सोडले घरी; दोन हजार 216 पैकी 45 व्यक्‍तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह 
 • को-मॉर्बिडचा सर्व्हे महत्त्वाचा 
  शहरातील विडी कामगार, वस्त्रोद्योगातील कामगार, बाजार समित्या तथा शहराअंर्तगत भाजी मंडईत भाजीपाला विक्री करणाऱ्या कामगार तथा विक्रेत्यांची रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट केली जाणार आहे. तसेच गाळेधारकांसह व्यापारी लोकांचीही ऍन्टीजेन टेस्ट करण्याचे आदेश महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी दोन दिवसांपूर्वी दिले आहेत. त्यानुसार स्वतंत्र सर्व्हे करण्यात येत असून आगामी आठ दिवसांत दोन लाख लोकांपर्यंत पोहचण्याचे उद्दिष्टे ठेवण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four thousand 400 patients in the city overcome the corona! Today 46 positive and two died