चार वर्षानंतर शेतकऱ्यांना मिळाली गुड न्यूज 

logo
logo
Updated on

सोलापूर : कधी दुष्काळ तर कधी शेतमालाचे पडलेले भाव यामुळे खचलेल्या बळीराजाला सरकारकडून मदतीचा हात अपेक्षित असतो. 2016-17 मध्ये कांद्याचे दर घसरल्यामुळे सरकारने कांद्यासाठी 100 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे अनुदान देण्याचे जाहीर केले. चार वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या अनुदानाची रक्कम सरकारने आता शेतकऱ्यांसाठी दिली आहे. राज्यातील पाच हजार 282 शेतकऱ्यांसाठी सरकारने चार कोटी 25 लाख रुपयांचे अनुदान देण्यास मान्यता दिली आहे. 
हेही वाचा - राज्य कर्जाच्या खाईत... किती आहे राज्यावरील कर्ज नक्की वाचा 
2016-17 या वर्षातील मदतीसाठी नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, परभणी या जिल्ह्यातील दोन हजार 750 शेतकरी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना एक कोटी 72 लाख 24 हजार 994 रुपये मिळणार आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 1602, सोलापूर जिल्ह्यातील 445, औरंगाबादमधील 14 तर परभणी जिल्ह्यातील 689 शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरले आहेत. 2016- 17 मध्ये कांद्याचे दर पडल्यानंतर या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने प्रति क्विंटल शंभर रुपये प्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. 2018-19 मध्येही कांद्याचे दर पडल्यानंतर या कालावधीतील शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी सरकारने प्रति क्विंटल दोनशे रुपये या प्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. 
हेही वाचा - महास्वामींचा फैसला उद्या? जंगमचे दोन दाखले रद्द 
दोनशे रुपयांच्या अनुदानासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा कृषी उत्पन्न बाजार समिती व नाशिक जिल्ह्यातील नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 2 हजार 532 शेतकरी पात्र ठरले आहेत. परांडा येथील 2198 व नांदगाव येथील 334 शेतकऱ्यांना दोन कोटी 30 लाख 29 हजार 366 रुपये मंजूर झाले आहेत. अनुदानासाठी प्रस्ताव पाठविल्यानंतर मदतीची वाट पाहून थकलेल्या शेतकऱ्यांना तब्बल चार वर्षानंतर अनुदानाची रक्कम मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Congress spokesperson Hanumant Pawar criticizes BJP over Ram Mandir credit politics and 'Ladki Bahin' scheme policy
Marathi News Esakal
www.esakal.com