
ज्येष्ठ गांधीवादी चंदुभाई देढिया यांना याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी सांगितले की, मूळात गांधींच्या पुतळ्याचे लोकेशन चुकीच्या जागी झाले आहे. हे ठिकाण अडगळीचे आहे. या पुतळ्याकडे कुणाचेही लक्ष नाही. केवळ 2 ऑक्टोबर व 30 जानेवारी रोजी गांधींजीची आठवण पुढाऱ्यांना होते. शिवाय आम्ही गांधीवादी म्हणजे अगदी मुठभर मंडळी आमची कोणीही दखल घेत नाही. या पुतळ्याच्या दुरावस्थेबद्दल मी अनेकदा महापालिकेला निवेदने दिली आहेत. मात्र प्रशासन दखल घेत नाही.
सोलापूर : सोलापूर शहर हे पुतळ्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरातील प्रत्येक चौकात एका महामानवाचा पुतळा आहे. इतके सारे पुतळे उभारल्यानंतर त्याची निगा राखणे, स्वच्छता ठेवणे, पुरेशी प्रकाशाची व्यवस्था करणे ही महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, शहरातील रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधीजींचा पुतळा मागील वीस दिवसांपासून अंधारात आहे. याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने जगाला मानवतेचा प्रकाश देणारे गांधींजी सध्या अंधारात आहेत.
शहरातील पोस्ट कार्यालयासमोर महात्मा गांधींजीची पुतळा आहे. दोन महिन्यापूर्वी 2 ऑक्टोबर रोजी सोलापूरसह देशभरात गांधी जयंती उत्साहात साजरी झाली. त्यादिवशी गांधींजीच्या पुतळ्याभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पुष्पहारांचे ढिग लागले होते. कोरोनाचा काळ असतानाची दिवसभर सर्व राजकीय पक्षांच्या नेते मंडळीची अभिवादनासाठी रिघ लागली होती. अभिवादन करतानाची छायाचित्रे वृत्तपत्रांसह समाज माध्यमातून प्रसिद्ध होत होती. मात्र, दोनच माहिन्यांनी येथील व्यवस्थेकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या पुतळ्याजवळील विजेची व्यवस्था मागील वीस दिवस ते एक महिन्यांपासून बंद आहे, याकडे कुणाचेही लक्ष नाही. येथील विजेचे दिवे त्वरीत सुरू करण्यात यावे, अशी मागणी गांधीप्रेमींमधून होत आहे.
याबद्दल ज्येष्ठ गांधीवादी चंदुभाई देढिया यांना याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी सांगितले की, मूळात गांधींच्या पुतळ्याचे लोकेशन चुकीच्या जागी झाले आहे. हे ठिकाण अडगळीचे आहे. या पुतळ्याकडे कुणाचेही लक्ष नाही. केवळ 2 ऑक्टोबर व 30 जानेवारी रोजी गांधींजीची आठवण पुढाऱ्यांना होते. शिवाय आम्ही गांधीवादी म्हणजे अगदी मुठभर मंडळी आमची कोणीही दखल घेत नाही. या पुतळ्याच्या दुरावस्थेबद्दल मी अनेकदा महापालिकेला निवेदने दिली आहेत. मात्र प्रशासन दखल घेत नाही.
याबद्दल महापालिका प्रशासनाचे संदीप कारंजे यांना विचारले असता अद्याप त्यांनी त्वरीत दुरुस्ती करण्यात येईल, असे सांगितले.
संपादन : अरविंद मोटे