प्रेमात धोका! मित्रांच्या साथीने १० जणांचा अल्पवीयन मुलीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी विजापूर नाका परिसरात एका मंदिराजवळ रडत थांबली होती. त्या वेळी मुलीला रस्त्यावरून जाणाऱ्या एका नागरिकाने पाहिले. त्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.  त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली.

सोलापूर : महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत असतानाच मंगळवारी (ता. ११) सोलापुरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी १० जणांवर विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात पाच जणांना अटक करण्यात आली असून यातील इतर संशयित आरोपींचा शोध सुरू आहे.
मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी विजापूर नाका परिसरात एका मंदिराजवळ रडत थांबली होती. त्या वेळी मुलीला रस्त्यावरून जाणाऱ्या एका नागरिकाने पाहिले. त्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.  त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. तेव्हा काही दिवसांपासून काही तरुण पीडित मुलीला जबरदस्तीने घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार करत असल्याचे समोर आले. पोलिसांना या घटनेची माहिती कळताच तपासाची चक्रे फिरवली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पाच जणांना पोलिसांनी अटक केली होती. पीडित मुलीचे एका तरुणासोबत प्रेमप्रकरण होते. त्यातूनच त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्याच्या ओळखीतून इतर तरुणांनी तिचा गैरफायदा घेतला आहे.
 या प्रकरणात विजापूर नाका पोलिस ठाण्यात सामूहिक अत्याचार, ॲट्रॉसिटी आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे यांनी दिली. या प्रकरणाने महिला सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gang rape of a minor girl in Solapur