गौरी-लक्ष्मीच्या सणाला दरवाजा उघडा ठेवला अन्‌ चोरट्याने.. 

प्रमोद बोडके
Thursday, 27 August 2020

ऑटो शोरूममधून दोन लाख 25 हजारांची चोरी 
सोलापुरातील गुरुनानक चौकातील महापालिकेच्या गळ्यात असलेल्या साई मोटर्स ऍण्ड ऑटो कन्सल्टींगमधून अनोळखी चोरट्याने दोन लाख पंचवीस हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. ही घटना 26 ऑगस्ट रोजी रात्री 7 ते 27 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी जहांगिर महेबुब नदाफ (वय 49, रा. किसन नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) यांनी सदर बझार पोलिसात फिर्याद दिली आहे. साई मोटर्सचे कुलुप तोडून चोरट्याने ऑफिसमध्ये प्रवेश केला. ऑफिसच्या लोखंडी कपाटातून ही रक्कम लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

सोलापूर : घरात गौरी-लक्ष्मीचा सण असल्याने दरवाजा अर्धवट उघडा ठेवून घरातील सदस्य हॉलमध्ये झोपी गेले. अनोळखी चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील चार लाख 85 हजार रुपयांचे दागिने लंपास केले. ही घटना 26 ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा ते 27 ऑगस्ट रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. घरात गौरी-लक्ष्मी आल्याने या काळात घराचे दरवाजे लावू नयेत, त्यामुळे घरातून लक्ष्मी निघून जाते असाच काहीसा समज आजही शहरी व ग्रामीण भागात आहे. 
संतोष नामदेव वाघमारे (वय 45, रा. गोकुळ सोसायटी, जुळे सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली आहे. चोरट्याने नऊ तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्यांचे दोन जोड, सहा तळ्याच्या बांगड्या, अर्ध्या तोळ्याचे कानातील एक जोड, पिळ्याच्या चार अंगठ्या, लक्ष्मी व गणपतीची चांदीची मूर्ती, चांदीच्या निरंजनाचे एक जोड, चांदीचे पंचपाळ व पाच हजार रुपये रोख अशा ऐवजाची चोरी केली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gauri-Lakshmi's festival was left open...