गेटुंआ लाडू, नम्रतेमधली श्रीमंती आणि रंगारंग लोककलेचा आनंद 

प्रकाश सनपूरकर
Sunday, 27 September 2020

राजस्थान मधील सम या गावालगत विदेशी पक्ष्यांचे प्रवेशद्वार असलेल्या नॅशनल डेझर्ट पार्क (एनडीपी) च्या पर्यटन सहलीच्या आठवणी ते सांगत होते. 2017 च्या डिसेंबर महिन्यात आम्ही पक्षी निरीक्षकांनी सम येथील नॅशनल डेझर्ट पार्कला भेट देण्याचे ठरवले. 

सोलापूरः मित्रांसोबत गप्पा.....आगळ्या चवीचा गेंटूआ लाडू....गावकऱ्यांचे आदरातिथ्य आणि पक्ष्यांच्या भरगच्च छायाचित्रणाच्या आठवणी हा सम (राजस्थान) येथील नॅशनल डेझर्ट पार्कच्या पर्यटन आठवणीचा ठेवा आजही तेवढाच आनंददायी वाटतोय ही भावना पर्यटक तथा पक्षीनिरीक्षक शिवानंद हिरेमठ यांनी व्यक्त केली. 

हेही वाचाः माझी रायगड वारी 

राजस्थान मधील सम या गावालगत विदेशी पक्ष्यांचे प्रवेशद्वार असलेल्या नॅशनल डेझर्ट पार्क (एनडीपी) च्या पर्यटन सहलीच्या आठवणी ते सांगत होते. 2017 च्या डिसेंबर महिन्यात आम्ही पक्षी निरीक्षकांनी सम येथील नॅशनल डेझर्ट पार्कला भेट देण्याचे ठरवले. 

हेही वाचाः आमदार यशवंत मानेः भागाईवाडी विकासाचे मॉडेल 

पुणे येथून जैसलमेरपर्यंत थेट रेल्वे असल्याने प्रवासाची सोय होती. माझ्यासह पक्षी निरीक्षक अरविंद कुंभार, निरंजन मोरे, वैभव जाधव, परमेश्‍वर पाटील, ऋतुराज कुंभार, रुपेश बलसार असे एकत्र जाण्याचा हा बेत होता. त्या भागातील कडाक्‍याची थंडी लक्षात घेऊन गरम कपडे जास्त घेतले. पुणे येथून जैसलमेरला काही अडचणीने पाच तास उशिरा पोहोचलो. तोपर्यंत सम गावाला घेऊन जाणारा वाहनचालक वाट पाहून निघून गेला. दुसऱ्या वाहनाने सम गावातील हॉटेलमध्ये पोहोचलो. सम गाव म्हणजे अगदी चाळीस पन्नास घराच्या वस्तीचे गाव. पण गावकऱ्यांचे अगदी गरीबीतले जीवन पण त्यांच्या नम्रतेची श्रीमंती प्रत्येक कृतीतून मांडली जात होती. त्यांच्या या आदरातिथ्याने भारावल्यासारखे झाले. गावकऱ्यांचा व्यवसाय मेंढी व गायी पालनाचा. सर्व मेंढ्या व गायी पांढऱ्या रंगाच्या. मेंढ्याच्या डोक्‍यांचा काळा रंग. उन्हाळ्यात पांढरा रंग त्यांना उष्णतेपासून वाचवतो. 
डिसेंबर महिना असल्याने तापमान केवळ दोन-तीन अंश सेल्सियस होते. सोलापूर अन्‌ सम गावातील तापमानाच्या फरकाने गारठून जाण्याची वेळ आली. आहारातून काढलेले परोठे, फोडणीची दाळ आणि दही हा जेवणाचा बेत होता. तेथून काही अंतरावर पाकिस्तानची सीमा होती. गावातील लोक पाकिस्तानातील नातेवाईकांना भेटून सहज येतात. या गावाला जाताना अणुस्फोटासाठी ओळखले जाणारे पोखरण गाव पाहण्यास मिळाले. तेथे डेझर्ट फेस्टीव्हलमधील लोकनृत्ये पाहिली. लोककलावंत राजूभाई हे तर राष्ट्रपती भवनात कार्यक्रम सादर केलेले लोककलावंत होते. त्यांनी आम्हाला ऊबदार रग भेट म्हणून दिल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Getuna Laddu, the richness of humility and the joy of colorful folk art