गुडन्यूज...13 हजार पोलिसांना दिलासा 

प्रमोद बोडके
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

या निर्णयामुळे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संवर्गातील 1245, पोलिस हवालदार लेखनिक संवर्गातील 441, पोलिस हवालदार संवर्गातील 6 हजार 407, पोलिस नाईक संवर्गातील 2 हजार 215, पोलिस शिपाई 109, सेवानिवृत्त, स्वेच्छासेवानिवृत्त आणि दिवंगत पोलिस 3 हजार 492 कर्मचाऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.

सोलापूर : बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत कार्यरत असलेल्या/राहिलेल्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, सहायक हवालदार लेखनिक, पोलिस हवालदार, पोलिस नाईक, पोलिस शिपाई, सेवानिवृत्ती, स्वेच्छासेवानिवृत्त आणि दिवंगत पोलिस अशा 13 हजार 909 पोलिसांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. 1993 पूर्वी पोलिस शिपाई पदावर नियुक्ती झालेल्या या कर्मचाऱ्यांना संगणक हाताळणी बाबतचे ज्ञान आवश्‍यक होते. हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी या पोलिसांना शासनाने सूट दिली आहे. 

aschim-maharashtra-news/solapur/relief-teachers-state-261868">हेही वाचा - राज्यातील साडेनऊ हजार शिक्षकांना दिलासा 
हे प्रमाणपत्र नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. 1993 पूर्वी नियुक्त झालेल्या पोलिस शिपाई कर्मचाऱ्यांची शैक्षणिक अर्हता आठवी पास अशी होती. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण महामंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या संगणक अर्हता परीक्षेसाठी हे कर्मचारी बसू शकले नाहीत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना ही अर्हता परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करण्यात आले नाही. प्रमाणपत्रा अभावी सातव्या वेतन आयोगानुसार या कर्मचाऱ्यांची वेतन निश्‍चिती करण्यात आली नव्हती. 30 नोव्हेंबर 1993 पूर्वी ज्या कर्मचाऱ्यांची पोलिस शिपाई पदावर नियुक्ती झाली आहे. अशा कर्मचाऱ्यांना या सवलतीचा लाभ मिळणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news ... 13 thousand policemen comfort