खुशखबर : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात वाढ नाही !  सोलापूर विद्यापीठाने दिले महाविद्यालयांना पत्र : कोरोनामुळे घेतला निर्णय 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

कोविड-19 मुळे जगभरात महामारीचा प्रसंग उद्‌भवला आहे. 23 मार्चपासून देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. आता टप्याटप्याने अनलॉक करणे सुरू झाले आहे. त्यामुळे राज्यातील उद्योगधंदे, व्यवसाय, खासगी नोकरी क्षेत्रात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. अशा परिस्थितीत शैक्षणिक शुल्कात वाढ करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. त्यामुळे 2020-2021 या शैक्षणिक वर्षासाठी शैक्षणिक शुल्कात वाढ करू नये, असे विद्यापीठाने महाविद्यालयांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. तत्पूर्वी, प्रयास संघटनेचे प्रमुख सचिन शिंदे यांनी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र.कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे यांना निवेदन देऊन शैक्षणिक शुल्क वाढ करू नये, असे निवेदन दिले होते. 

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाशी संलग्नित कोणत्याही महाविद्यालयांनी यंदा शैक्षणिक शुल्कात कोणतीही वाढ करू नये, असे पत्र विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने महाविद्यालयांना पाठविले आहे. 
कोविड-19 मुळे जगभरात महामारीचा प्रसंग उद्‌भवला आहे. 23 मार्चपासून देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. आता टप्याटप्याने अनलॉक करणे सुरू झाले आहे. त्यामुळे राज्यातील उद्योगधंदे, व्यवसाय, खासगी नोकरी क्षेत्रात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. अशा परिस्थितीत शैक्षणिक शुल्कात वाढ करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. त्यामुळे 2020-2021 या शैक्षणिक वर्षासाठी शैक्षणिक शुल्कात वाढ करू नये, असे विद्यापीठाने महाविद्यालयांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. तत्पूर्वी, प्रयास संघटनेचे प्रमुख सचिन शिंदे यांनी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र.कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे यांना निवेदन देऊन शैक्षणिक शुल्क वाढ करू नये, असे निवेदन दिले होते. 

शैक्षणिक शुल्क भरण्यास द्यावी सवलत 
लॉकडाउननंतर विद्यार्थ्यांच्या अर्थिक परिस्थितीचा विचार करून त्यांच्या मागणीनुसार त्यांना शैक्षणिक शुल्क भरण्यास सवलत द्यावी. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून ज्यादा शैक्षणिक शुल्क घेऊ नये, असे पत्र विद्यापीठाच्या अभ्यास मंडळे विभागाचे प्रमुख पी. आर. चोरमले यांनी विद्यापीठांना पाठविले आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यापीठाशी संलग्नित 108 महविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 

संपादन : अरविंद मोटे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news: No increase in students' tuition fees! Letter from Solapur University to the colleges: The decision was taken because of Corona