पंढरपुरात झाले धान्याचे खरेदी विक्री केंद्र

 A grain buying and selling center was set up in Pandharpur
A grain buying and selling center was set up in Pandharpur
Updated on

पंढरपूर - शेतकऱ्यांनी पिकवलेल्या धान्याला आधारभूत किंमत मिळावी यासाठी राज्य सरकारने आधारभूत धान्य खरेदी केंद्रे सुरु केली आहेत. यामध्ये पंढरपूर येथेही आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. येथील खरेदी विक्री संघाच्या वतीने मका धान्याची खरेदी केली जाणार आहे. शेतकऱ्यांनीऑनलाईन नोंदी करावी असे आवाहन खरेदी विक्री संघाचे सभापती शांतीनाथ बागल यांनी केले आहे. 

लॉकडाऊनने बाजार समित्या आणि खासगी बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल विक्री करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशातच अनेक खासगी व्यापारी कमी किंमतीमध्ये मका, गहू, हरभरा, ज्वारीसह इतर धान्याची खरेदी करत असल्याचे लक्षात येताच. राज्य सरकारने तातडीने ग्रामीण भागात आधारभूत धान्य खरेदी केंद्रे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. 

पंढरपूर तालुक्‍यात सध्या मक्‍याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मागील अनेक दिवसांपासून मका खरेदी केंद्र सरु करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात होती. अलीकडेच आमदार भारत भालके यांनी देखील मका खरेदी केंद्र सुरु करावे या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादा भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पाठ पुरावा केला होता. त्यानंतर पंढरपूर येथे आधारभूत मका खरेदी केंद्र सुरु करण्यास परवानगी दिली आहे. 


तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने येथील शासकीय धान्य गोदामात मक्‍याची 1 हजार 760 रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी केली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी. त्यांतर संबंधीत शेतकऱ्यांनी सातबारा उतारा, मका पीक असल्याचा दाखला,बॅंक पास बुक आदी कागदपत्रे पंढरपूर येथील नवीन पेठेतील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात जमा करावीत. किंवा 9145539828 या मोबाईलवर क्रमांकावर शेतकर्यांनी संपर्क साधावा असे आवाहनही खरेदी विक्री संघाचे सभापती श्री. बागल यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Council Election Strategy in Action: BJP Mobilizes Corporators, Ensures Early Voting
Court Battle Looms Over Chemical Treatment of Vitthal-Rukmini Idol in Pandharpur
solapur
MLA Devendra Kothe  
Marathi News Esakal
www.esakal.com