''व्हॉटस यु्अर क्रेडो'' पुस्तकाचे शानदार प्रकाशन

प्रकाश सनपूरकर
Sunday, 24 January 2021

येथील बालाजी सरोवरच्या प्रांगणात मयंक अग्रवाल लिखीत व्हॉटस युअर क्रेडो या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (ता. 25) करण्यात आले.

सोलापूर : वास्तव जीवन व जगण्याची मुल्ये या दोन्हीमधील सिमारेषा स्पष्ट करण्याचा प्रयत्न म्हणजे एका अर्थाने स्व चा शोधाचा प्रवास व्हॉटस युअर क्रेडो या पुस्तकातुन प्रभावीपणे मांडला गेला आहे असे मत रेल्वे हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. आनंद कांबळे यांनी येथे व्यक्त केले. 
येथील बालाजी सरोवरच्या प्रांगणात मयंक अग्रवाल लिखीत व्हॉटस युअर क्रेडो या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (ता. 25) करण्यात आले. 
यावेळी बोलताना डॉ. कांबळे पुढे म्हणाले की, हे लेखन निव्वळ अप्रतिम झाले आहे. लेखकाने रेल्वे हॉस्पिटलमध्ये कोविड आजारात उपचार घेत असताना केलेले हे लेखन अत्यंत वेगळ्या धाटणीचे आहे. हे पुस्तक म्हणजे जगण्याचे वेगळे तत्वचिंतन मांडण्याचा चांगला प्रयत्न आहे. लेखकाने स्वानुभवाच्या आधारे मांडलेले विचार मोलाचे असल्याचे सांगितले. 
यावेळी मनोगत व्यक्त करताना मंयक अग्रवाल यांनी सांगितले की, कोरोनाचे उपचार घेत असताना तेथे असलेला अलिप्तपणा, जगाशी कमी झालेला संवाद, एकटेपणाने मला नव्या पध्दतीने जगण्याबद्दल विचार करण्याची अंतः प्रेरणा दिली त्यातून हे लेखन सुचले. क्रेडो म्हणजे विश्‍वास नेमका काय असावा यावर हे लेखन झाले. समृध्दी व जिवनमुल्यांच्या सोबतीने काय असावे याचा शोध मी लेखनातून घेतला. तेव्हा इतरांची मला होणारी मदत, लोकांची लोकांना होणारी मदत हे मुद्दे प्रकर्षाने जाणवले. आपण जगत असताना सर्वोत्कृष्ट अशी कामगिरी करुन दाखवली पाहीजे हे स्पष्टपणे जाणवले. एकूण आठ भागात असलेल्या या लेखनात काही कविता व मुक्त लेखनाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. 
यावेळी व्यासपीठावर प्रा. हलकोडे, बेंगलोरचे जीएसटी कमिशनर श्री.सुरेंद्र, डॉ.रमेश अग्रवाल, दिनेश अग्रवाल आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रतन अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमासाठी संतोष उदगिरे, रामेश्‍वर उदगिरे यांनी सहकार्य केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Great publication of the book "What's Your Credo"