गटशेतीतून सापडेल प्रगतीचा नवा मार्ग 

gatsheti.jpg
gatsheti.jpg
Updated on

लवंग (सोलापूर)ः शेती करताना शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत म्हणून वैयक्तिक शेतीपेक्षा गट शेतीला प्राधान्य द्या, त्यातूनच निश्‍चित प्रगतीचा नवा मार्ग सापडेल असे प्रतिपादन मंडळ कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी केले. 

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांना वाघोली येथील प्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ झाला. 
यावेळी लवंगचे पोलीस पाटील यांनी गट शेतीचे महत्व विशद करताना 'गटशेती करा आणि विकास साधा' असा मंत्र दिला. 

कार्यक्रमासाठी लवंग ग्रामपंचायत सदस्य धनाजी चव्हाण, प्रगतशील शेतकरी आकाश वाघ, सदाशिव भोसले, प्रशांत पाटील, दत्तात्रय चव्हाण आदी उपस्थित होते. 
सर्कल प्रमुख विनोद भोसले यांनी भविष्यामध्ये गावातील शेतकऱ्यांना गट शेतीकडे वळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून शेतकऱ्यांना संघटित करताना त्यांची कंपनी तयार क रण्याचा मनोदयही व्यक्त केला. प्रशिक्षक इरशाद शेख यांनी शेतीचे महत्व विशद करताना मजुरांअभावी शेतीचे व्यवस्थापन कसे करावे गटशेतीचे फायदे कोणते सामुदायिक शेतीतून उत्पादन खर्च कमी आणि उत्पन्न ज्यादा कसे मिळवता येते आदी विषयी मार्गदर्शन केले.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

anti corruption buro, solapur
Solapur Crime
Council Election Strategy in Action: BJP Mobilizes Corporators, Ensures Early Voting
Court Battle Looms Over Chemical Treatment of Vitthal-Rukmini Idol in Pandharpur
Marathi News Esakal
www.esakal.com