esakal | मराठा आंदोलनाला वाढता पाठिंबा  रिपाइं, वंचित, एमआयएमसह प्रमुख पक्षांचा 21 सप्टेंबरच्या सोलापूर बंदला पाठिंबा 
sakal

बोलून बातमी शोधा

Maratha baithak.jpeg

21 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बंदला आता दिवसेंदिवस पाठिंबा वाढू लागला आहे. बंदच्या पार्श्‍वभूमीवर आज सोलापुरातील सर्व पक्षीय नेते मंडळींची बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्वच राजकीय पक्ष्याच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठिंब्याचे पत्र दिले.

मराठा आंदोलनाला वाढता पाठिंबा  रिपाइं, वंचित, एमआयएमसह प्रमुख पक्षांचा 21 सप्टेंबरच्या सोलापूर बंदला पाठिंबा 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सोलापूर : सकल मराठा समाजाच्यावतीने आरक्षनाच्या लढ्यासाठी 21 सप्टेंबर रोजी सोलापूर शहर व जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाच्या आंदोलनासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम यासह सर्वच प्रमुख पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. 21 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बंदला आता दिवसेंदिवस पाठिंबा वाढू लागला आहे. 
बंदच्या पार्श्‍वभूमीवर आज सोलापुरातील सर्व पक्षीय नेते मंडळींची बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्वच राजकीय पक्ष्याच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठिंब्याचे पत्र दिले. या बंदमध्ये सहभागी होऊन बंद यशस्वी करण्याचे आवाहनही केले. या बैठकीत रिपाई आठवले गटाचे राजाभाऊ सरवदे, वंचित बहुजन आघाडीचे शहर प्रमुख गणेश पुजारी, एमआयएमचे रियाझ खैरदी, बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष देवा उघडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सोलापूर शहर अध्यक्ष भारत जाधव, कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले, शिवसेनेचे शहर अध्यक्ष गुरुशांत धुत्तरगावकर, भाजपचे शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, मुस्लिम ब्रिगेडचे मतीन बागवान सहभागी झाले होते. 
या नेत्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊन सर्व पक्षीय नेते मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. बैठकीला के. डी. कांबळे, गौतम चंदनशिवे, फारुख शेख, राजू हुंडेकरी, शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे, राजन जाधव, चंद्रकांत वानकार, सोलापूर शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी उपमहापौर नानासाहेब काळे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वानकर, दिनकर जगदाळे, माउली पवार, नगरसेवक विनोद भोसले, भाऊ रोडगे, लहू गायकवाड, गणेश डोंगरे, संजय जाधव, जीवन यादव, प्रकाश ननावरे, दत्ता भोसले, संजय डोंगरे, हनुमंत पवार, सचिन गायकवाड, बाबा सूर्यवंशी आदी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. गणेश देशमुख यांनी केले. 

संपादन : अरविंद मोटे