हरभऱ्यासाठी 5100 रुपयांचा हमीभाव ! जिल्ह्यात सात खरेदी केंद्रे

तात्या लांडगे
Wednesday, 17 February 2021

शेतकऱ्यांना मार्केटिंग फेडरेशनचे आवाहन... 

  • 'एनईएमएल' या पोर्टलवरुन चणा खरेदीसाठी करावी ऑनलाइन नोंदणी 
  • नाफेडकडून जिल्ह्यात नऊ ठिकाणी होईल हमीभावाने हरभरा खरेदी 
  • प्रति क्‍विंटल हरभऱ्यासाठी दिला जाईल पाच हजार 100 रुपयांचा हमीभाव 
  • नोंदणीसाठी पिकाची नोंद असलेला सात-बारा, आधारकार्ड, बॅंक पासबूक झेरॉक्‍स द्यावा लागेल 

सोलापूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून हमीभावाने हरभरा खरेदी करण्यासाठी नाफेडतर्फे नऊ खरेदी केंद्रे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापुरातील केंद्रावर उत्तर व दक्षिण सोलापुरातील शेतकऱ्यांचा हरभरा, कुर्डूवाडीच्या केंद्रावर माढ्यातील शेतकरी, मंगळवेढ्यातील केंद्रावर पंढरपूर व मंगळेवढ्यातील शेतकरी, करमाळ्यातील केंद्रावर करमाळा व माळशिरस येथील शेतकरी, अनगर केंद्रावर मोहोळ तालुक्‍यातील शेतकरी तर मरवडे येथील केंद्रावर मंगळवेढा व सांगोल्यातील शेतकरी शेतमाल हमीभावाने विक्री करु शकतील, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी भास्कर वाडीकर यांनी दिली.

शेतकऱ्यांना मार्केटिंग फेडरेशनचे आवाहन... 

  • 'एनईएमएल' या पोर्टलवरुन चणा खरेदीसाठी करावी ऑनलाइन नोंदणी 
  • नाफेडकडून जिल्ह्यात नऊ ठिकाणी होईल हमीभावाने हरभरा खरेदी 
  • प्रति क्‍विंटल हरभऱ्यासाठी दिला जाईल पाच हजार 100 रुपयांचा हमीभाव 
  • नोंदणीसाठी पिकाची नोंद असलेला सात-बारा, आधारकार्ड, बॅंक पासबूक झेरॉक्‍स द्यावा लागेल 

 

शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर एसएमएस पाठविला जाणार आहे. त्या दिवशी त्यांनी स्वच्छ व वाळलेला चणा विक्रीसाठी हमीभाव केंद्रावर आणावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. सध्या बाजारात हरभऱ्याला प्रति क्‍विंटल चार हजार 500 रुपयांपर्यंत दर आहे. तरीही यंदा जिल्हाभरातून 70 हजार क्‍विंटल हरभरा हमीभाव केंद्रावर खरेदी होऊ शकतो, असा अंदाज मार्केटिंग फेडरेशनने वर्तविला आहे. शेतकऱ्यांसाठी सध्या ऑनलाइन नोंदणी सुरु झाली असून वेळेत त्यांनी नोंदणी करुन घ्यावी. जेणेकरुन त्यांना प्रति क्‍विंटल पाच हजार 100 रुपयांचा हमीभाव मिळेल, असेही वाडीकर यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात नऊ खरेदी केंद्रे 
संत दामाजी शेती व साधन पुरवठा सहकारी संस्था, मंगळवेढा (सोलापूर), संत दामाजी शेती व साधन पुरवठा सहकारी संस्था, मंगळवेढा (अक्‍कलकोट), विकास सेवा सोसायटी, दुधनी, तुळजाभवानी कृषी व साधन पुरवठा सहकारी संस्था, उंबरगे (बार्शी), कृषी उत्पन्न बाजार समिती, कुर्डूवाडी, तालुका खरेदी-विक्री संघ, मंगळवेढा विठ्ठल सर्वसाधारण सहकारी संस्था, मांगी (करमाळा), विकास सेवा सहकारी सोसायटी (अनगर) आणि भाळवणी कृषी फामर्स प्रोड्यूसर कंपनी (मरवडे) या ठिकाणी हरभरा खरेदी केली जाणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guaranteed price of Rs. 5,100 per quintal for gram! Seven shopping centers in the district