पालकमंत्री भरणे म्हणतात, "त्या' नागरिकांवर दाखल करा गुन्हे 

हुकुम मुलाणी 
Saturday, 29 August 2020

मंगळवेढा (सोलापूर) ः तालुक्‍यात कोरोना रोगाच्या अटकावसाठी प्रशासनाने केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. तपासणीसाठी अडथळा करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या. 

मंगळवेढा (सोलापूर) ः तालुक्‍यात कोरोना रोगाच्या अटकावसाठी प्रशासनाने केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. तपासणीसाठी अडथळा करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या. 

येथील तहसील कार्यालयात कोरोना नियंत्रणासाठी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीस आमदार भारत भालके, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्निल रावडे, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील, पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, आरोग्य अधिकारी 
डॉ. नंदकुमार शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद शिंदे, प्रभारी गटविकास अधिकारी संतोष राऊत उपस्थित होते. 

यावेळी उपविभागीय अधिकारी भोसले यांनी आतापर्यंत प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तपासणीस नागरिकांचा विरोध असून तालुक्‍यांमध्ये ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्‍न शासनस्तरावर प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार भालके यांनी आयटीआय येथे नवीन कोविड सेंटर उभारणे, कोविड सेंटरच्या ठिकाणी पोलिस संरक्षण देणे व स्वच्छता ठेवणे, चाचणीसाठी कॅम्प लावण्याची मागणी केली. तालुक्‍यातील आरोग्य खात्यातील रिक्त पदे भरण्याचा दृष्टीने प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पालकमंत्री भरणे म्हणाले, तालुक्‍यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. कोविड नियंत्रणासाठी शासन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. जनतेने सोशल डिस्टन्सचे पालन करावे. रुग्ण वाढल्यास मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतील. त्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी. कोविड नियंत्रणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असेही त्यांनी सांगितले. आढावा बैठकीनंतर नागरिकांनी निवेदने देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. 
संपादन ः संतोष सिरसट 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Bharne says, "File charges against those citizens