दलित वस्ती सुधार योजनेबद्दल पालकमंत्री म्हणाले ! समान निधीशिवाय यादीला मंजुरी मिळणार नाहीच

तात्या लांडगे
Monday, 25 January 2021

पालकमंत्री घेणार आज बैठक 
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेअंर्गत 325 कामांना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने (21 जानेवारी 2021) बहुमताने मंजुरी दिली. मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत या विषयावरुन विरोधकांनी गदारोळ करीत यादीत माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक कामे असल्याचा आरोप केला. त्यानंतर दलित वस्ती ही शहरातील 15 प्रभागांमध्ये 50 टक्‍क्‍यांहून अधिक असून उर्वरित प्रभागांमध्येही कमी- अधिक प्रमाणात दलित वस्ती असल्याच्या बाबीवर चर्चा झाली. आता यासंदर्भात कॉंग्रेस, वंचित, राष्ट्रवादी कॉंग्रेस, एमआयएमच्या गटनेत्यांनी यादीत बदल करण्याची मागणी करीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे धाव घेतली. आता त्यासंदर्भात उद्या (26 जानेवारी) नियोजन भवनात बैठक होणार आहे. 

सोलापूर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत महापालिकेस विकासकामांसाठी 22 कोटी 90 लाखांचा निधी प्राप्त होणार आहे. निधी येण्यापूर्वीच योजनेतील कामांच्या यादीवरुन वाद निर्माण झाला आहे. योजनेअंतर्गत होणाऱ्या कामांच्या यादीत 325 पैकी 174 कामे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील असून सत्ताधाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या दबावाखाली ही यादी तयार केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर बोलताना पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, सर्व नगरसेवकांना समान निधी मिळायला हवा, त्याशिवाय यादी मंजूर केली जाणार नाही.

पालकमंत्री घेणार आज बैठक 
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेअंर्गत 325 कामांना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने (21 जानेवारी 2021) बहुमताने मंजुरी दिली. मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत या विषयावरुन विरोधकांनी गदारोळ करीत यादीत माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक कामे असल्याचा आरोप केला. त्यानंतर दलित वस्ती ही शहरातील 15 प्रभागांमध्ये 50 टक्‍क्‍यांहून अधिक असून उर्वरित प्रभागांमध्येही कमी- अधिक प्रमाणात दलित वस्ती असल्याच्या बाबीवर चर्चा झाली. आता यासंदर्भात कॉंग्रेस, वंचित, राष्ट्रवादी कॉंग्रेस, एमआयएमच्या गटनेत्यांनी यादीत बदल करण्याची मागणी करीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे धाव घेतली. आता त्यासंदर्भात उद्या (26 जानेवारी) नियोजन भवनात बैठक होणार आहे. 

महापालिकेने ठेवलेले करवसुलीचे उद्दिष्टे मागील चार वर्षात एकदाही पूर्ण न झाल्याने नगरसेवकांना विकासकामांसाठी भांडवली निधीच मिळालेला नाही. महापालिकेची निवडणूक आता एका वर्षावर आली असतानाही प्रभागातील विकासकामे न झाल्याने नागरिकांच्या नाराजीचा सामना करावा लागत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यातच दलित वस्ती सुधार योजनेचा निधीदेखील सत्ताधाऱ्यांनी आपापल्या प्रभागातच खर्च करण्याचा डाव आखला आहे. महापौर म्हणतात, सभागृहनेत्यांनी माझ्या परस्पर यादी तयार केली. मात्र, ते खोटे असून सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर ढकलाढकली करुन विषयाला बगल देण्याची भूमिका घेतल्याचा आरोप वंचित बहूजन आघाडीचे गटनेते आनंद चंदनशिवे, एमआयएमचे गटनेते रियाज खरादी यांनी केला आहे. शहरात ठिकठिकाणी दलित वस्ती असून त्याठिकाणीदेखील विकासकामे व्हावीत, या हेतूने आम्ही यादी बदलण्याची मागणी केल्याचेही त्यांनी 'सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. आज (सोमवारी) महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या उपस्थितीत गटनेत्यांची बैठक झाली, परंतु त्या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister says about Dalit Vasti Sudhar Yojana! The list will not be approved without equal funding