पालकमंत्री वळसे पाटील शुक्रवार, शनिवार सोलापूरच्या दौऱ्यावर 

प्रमोद बोडके
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

महिन्यातून एकदा दौरा 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपद न मिळाल्याने बाहेरच्या जिल्ह्यातील मंत्र्याची सोलापूरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे. महिन्यातून एकदा मी सोलापूरला येईन असा शब्द पालकमंत्री वळसे-पाटील यांनी पहिल्या दौऱ्यात दिला होता. जानेवारीमध्ये हा पहिला दौरा झाला होता. त्यानंतर आता फेब्रुवारीमध्ये उद्या दुसरा दौरा होत आहे. 

सोलापूर : राज्याचे कामगार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील उद्या (शुक्रवारी) दुपारी चार वाजता सोलापुरात येणार आहेत. केगाव येथील सिंहगड महाविद्यालयाच्या मैदानावर उद्यापासूपासून होणाऱ्या पुणे विभागाच्या महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री वळसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस पालकमंत्री वळसे-पाटील सोलापुरात असणार आहेत. 

aschim-maharashtra-news/solapur/chitra-wagh-said-justice-should-be-given-victim-during-month-263711">हेही वाचा - चित्रा वाघ म्हणाल्या, पिडितेला मिळावा महिन्यात न्याय 
शुक्रवारी स्पर्धेच्या उद्‌घाटनानंतर पालकमंत्री वळसे-पाटील रात्री सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात मुक्काम करणार आहेत. शनिवारी (ता. 22) सकाळी 9 ते 11 या वेळेत अभ्यागतांच्या भेटी, सोलापुरातील वोरोनोको प्राथमिक शाळेत राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने सुरू असलेल्या रुक्‍मिणी यात्रेला सकाळी 11 वाजता ते भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात पालकमंत्री वळसे-पाटील जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावा घेणार आहेत. 
हेही वाचा - डोक्‍यात साकारली छत्रपतींची प्रतिकृती 
दोन ते अडीच सोलापूर महापालिका, अडीच ते तीन जिल्हा परिषद, तीन ते साडेतीन पोलिस आयुक्तालय, साडेतीन ते चार सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक, चार ते साडेचार कृषी व सहकार विभाग, सायंकाळी साडेचार ते पाच यावेळेत भीमा कालवा मंडळ व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाची ते बैठक घेणार आहेत. पाच ते सहा यावेळी जिल्ह्यातील उर्वरित विभाग व जिल्हा महसूल प्रशासनाचा ते आढावा घेणार आहेत. रात्री 10. 40 वाजता सिद्धेश्वर एक्‍स्प्रेसने पालकमंत्री वळसे-पाटील मुंबईला रवाना होणार आहेत. दीड दिवसाच्या या दौऱ्यामध्ये पालकमंत्री वळसे-पाटील यांनी जिल्ह्याच्या विकास कामांची आढावा बैठक घेणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Valase Patil visits Solapur on Friday, Saturday