मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी घरकाम करणाऱ्या गुणाबाईने चोरले मालकिणीचे दीड लाखांचे गंठण

तात्या लांडगे
Saturday, 23 January 2021

यापूर्वीही केली होती चार हजारांची चोरी 
एक वर्षापूवी मुलीचा विवाह झाला होता आणि त्यावेळी उसनवारी करुन पैसे घेतले होते. डोक्‍यावरील कर्जाचा डोंगर हलका व्हावा म्हणून मालकिणीच्या घरातील दीड लाखांचे दागिने चोरल्याची कबुली गुणाबाई तुकाराम जाधव (वय 36, रा. विरशैव नगर, शेळगी) हिने दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. भालचिम यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. 

सोलापूर : शेळगी परिसरातील शिक्षक दांम्पत्यांच्या घरी दीड वर्षांपासून काम करणाऱ्या महिलेनेच (गुणाबाई तुकाराम जाधव) दागिने चोरी केल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही तिने चार हजार रुपयांची रोकड चोरी केली होती. मात्र, पती- पत्नी दोघेही शिक्षक असल्याने त्यांनी तक्रार केली नव्हती. 20 जानेवारीला दोघेही तळमजल्यावर बसले होते आणि ती महिला वरच्या मजल्यावर काम करीत होती. तरीही आपण चोरी केले नसल्याचे तिने सांगितले होते. त्यामुळे गीता कवलगिकर यांनी जेलरोड पोलिसांत धाव घेतली होती.

 

यापूर्वीही केली होती चार हजारांची चोरी 
बाहेरील लोकांकडून काही रक्‍कम उसनवारी तर काही रक्‍कम व्याजाने काढली होती. कमी पगारावर काम करीत असल्याने मुद्दल फेडणे अशक्‍य झाले होते. मुलीच्या लग्नातील कर्जाचा बोजा कमी होईल म्हणून मालकिणीच्या घरातील गंठण चोरल्याची कबुली गुणाबाई तुकाराम जाधव  (वय 36, रा. विरशैव नगर, शेळगी) हिने दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. भालचिम यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. 

 

शेळगी येथील लेंगरे परिसरातील बिराजदार शाळेजवळील गीता विरेश कवलगिकर यांच्या घरातून पाच तोळ्याचे गंठण चोरीला गेले. त्यानंतर त्यांनी जोडभावी पोलिसांत धाव घेतली आणि दीड लाखांचे सोन्याचे गंठण चोरीस गेल्याची फिर्याद नोंदविली. 20 जानेवारीला गीता व त्यांचे पती दोघेही सायंकाळी पाच वाजता गणपती दर्शनासाठी जाणार होते. त्यावेळी त्यांनी कपाट उघडले आणि पाहिले, तर त्यात गंठण नसल्याचे दिसून आले. त्यांनी घरकाम करणाऱ्या महिलेस विचारले, परंतु तिने आपण घेतले नसल्याचे सांगितले. त्यानंतर कवलगिकर यांनी पोलिसांत फिर्याद दिली. जेलरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्री. पवार, पोलिस हवालदार श्री. थोरात यांनी तपास केला. सुरवातीपासूनच घरकाम करणाऱ्या महिलेवर संशय असल्याने तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी गुणाबाई जाधव हिने पोलिसांना कबुली दिली असून चोरलेले दागिने परत केले आहेत, असेही श्री. भालचिम यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gunabai steals Rs 1.5 lakh from teachers family to pay off daughter's marriage loan