
सोलापूर : दमाणी शाळेजवळील वसुंधरा अपार्टमेंटमध्ये राहणारे नागनाथ लिंगप्पा गगनहळ्ळी (वय 65) हे त्यांची मुलगी सपना शितल विभुते (वय 36) हिच्यासह दुचाकीवरुन निघाले होते. हैदराबाद रोडवरील पर्ल गार्डनसमोर तुळजापूर रोड बायपासला वळण्यापूर्वीच त्यांच्या दुचाकीला गॅस सिलेंडर घेऊन उस्मानाबादकडे निघालेल्या ट्रकने धडक दिली. त्यामध्ये सपना यांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात नागनाथ गगनहळ्ळी यांचाही मृत्यू झाला.
ठळक बाबी...
कौटुंबिक वादामुळे सपना या मागील काही महिन्यांपासून माहेरी सोलापुरात वडिलांकडेच राहायला होत्या. सपना यांचा काही वर्षांपूर्वी सांगलीतील शित विभुते यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना एक पाच वर्षाचा मुलगा असून सपना त्यांच्या वडिलांसह काही कामानिमित्त दुचाकीवर बाहेर गेल्या होत्या. तुळजापूर रोड बायपासला वळण्यापूर्वीच त्यांच्या दुचाकीला ट्रकने (एमएच- 25, बी- 9977) धडक दिली. त्यामध्ये सपना खाली पडल्या. त्यांच्या डोकीस, पायाला गंभीर दुखापत झाली. वडिलांनाही जबर मार लागला. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. पतीपासून विभक्त राहणाऱ्या सपनाला पाच वर्षाचा मुलगा आहे. आता तो पोरका झाल्याचा सूर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात निघाला. अपघातानंतर जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवशंकर बोंदर, पोलिस निरीक्षक श्री. करणकोट यांनी भेट दिली. ट्रकचालक पांडूरंग नामदेव शिंदे (रा. बेंबळे, ता. तुळजापूर) याला ताब्यात घेतले आहे. गॅस सिलेंडर भरुन ट्रक उस्मानाबादकडे निघाला होता, अशी माहिती श्री. बोंदर यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.