कोरोनानंतर सोलापुरात गारपीट, अवकाळी पाऊस 

photo
photo

सोलापूर : सोलापूर शहर व परिसरात आज (शनिवारी) दुपारी तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. शहर व परिसरात गारपीट झाली. या अवकाळी पावसाने व गारपिटीने सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत हजेरी लावली आहे. सोलापुरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत असताना आज दुपारनंतर गारपीट व अवकाळी पावसाच्या माध्यमातून आणखी एक संकट ओढावले आहे.

सध्या सोलापुरात कोरोनाबाधित 14 रुग्ण असून एका 56 वर्षीय किराणा दुकानदाराचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या संकटाने चिंताग्रस्त असलेल्या सोलापूर शहर व जिल्ह्यावर आता अवकाळी पाऊस व गारपिटीचे संकट आले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोलापूर शहर व जिल्ह्यात तापमान वाढले होते. उष्णता आणि उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने लॉकडाउन जाहीर केल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी रस्त्यावर येऊन द्राक्षं विकली आहेत तर काही शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीचा पर्याय अवलंबला होता. आता गारपिटीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com