दिव्यांग, निराधारांचे मानधन दिवाळीपूर्वी द्या, अन्यथा आंदोलन 

प्रमोद बोडके
Wednesday, 11 November 2020

दिवाळी तोंडावर आली असताना मानधनाला झालेला विलंब हा निषेधार्ह आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे गोरगरिबांच्या जीवावर उठले आहे. अनुदान रखडल्याबाबतची माहिती मी स्वत: मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे. लवकरच मानधन दिले जाईल असे आश्वासन मला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे. 
- विजयकुमार देशमुख, आमदार 

सोलापूर : दिवाळी जवळ आली असतानाही राज्य सरकारने अद्यापपर्यंत दिव्यांग, निराधार, वृद्ध, गोरगरीब, नागरिक व महिलांचे मानधन दिलेले नाही. दिवाळीपूर्वी मानधन मिळावे यासाठी पाठपुरावा करुन देखील सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सोलापूरचे माजी पालकमंत्री तथा भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी केला आहे. 

लॉकडाऊन, अतिवृष्टी यासह इतर कारणास्तव आर्थिक अडचणीत सापलेल्या दिव्यांग, निराधारांची आणखी आर्थिक अडचण झाली आहे. शासनाने दिवाळीपूर्वी या सर्वांचे मानधन द्यावे अन्यथा राज्य सरकारविरोधात जन आंदोलन करण्याचा इशाराही आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: handicap, pay the honorarium of the destitute before Diwali, otherwise agitation