तुझ्यासोबत लग्न करून चूक केली..!

Crime News
Crime News
Updated on

सोलापूर : तुला स्वयंपाक येत नाही... तुझ्या हातचा स्वयंपाक चांगला होत नाही... तुझ्यासोबत लग्न करून चूक केली, असे म्हणून विवाहितेचा अपमान, छळ करण्यात आला. या प्रकरणात पतीसह चौघांवर सोलापुरात फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - चाइल्ड लाइनचे काम कसे चालते? वाचा बातमी..

फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद
पती निखिल रमेश गुरव, रमेश गणपत गुरव, विजया रमेश गुरव, पल्लवी रमेश गुरव (सर्व रा. वसुंधरा रचना अपार्टमेंट, बारामती) अशी आरोपींची नावे आहेत. शुभांगी नितीन गुरव (वय 29, सध्या रा. राजेश्‍वरीनगर, बाळे, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 17 मे 2017 ते 7 जानेवारी 2018 या कालावधीत घडली आहे. शुभांगी यांचे लग्न 17 मे 2017 रोजी निखिलसोबत झाले होते.

गाळा विकत घेण्यासाठी केली पाच लाखांची मागणी
सत्यनारायण पूजेसाठी शुभांगी यांचे वडील गेले होते. त्या वेळी, तुम्ही माझ्या मुलाच्या लग्नात योग्य प्रकारे सोन्याचे दागिने घातले नाहीत. अपेक्षा पूर्ण केली नाही... असे म्हणून निखिलच्या कुटुंबीयांनी भांडण केले. आहेरासाठी आणलेली साडी अंगावर फेकून दिली. तुला स्वयंपाक येत नाही, तुझ्या हातचा स्वयंपाक चांगला होत नाही, तुझ्यासोबत लग्न करून चूक केली असे म्हणून शुभांगी यांचा अपमान केला. तू नोकरी कर नाहीतर शिकवणी घेऊन पैसे कमव... बसून राहू नकोस असे म्हणून सतत त्रास दिला. शिकवणीसाठी गाळा विकत घ्यायचा आहे, असे म्हणून आरोपींनी पाच लाखांची मागणी केली. याच कारणावरून शुभांगी यांचा शारीरिक व मानसिक छळ करून त्यांना माहेरी हाकलून दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The mortal remains of Indian Army soldier Vaibhav Avtade were accorded a state funeral at his native village Ganeshwadi in Mangalwedha, Solapur district.
solapur-pune highway
solapur
solapur issues of voters
Marathi News Esakal
www.esakal.com