त्याने जिवंत सापाचे तोडले लचके : आक्रमक राखी खाटीकची शिकार

rakhi khatik 3.jpg
rakhi khatik 3.jpg
Updated on

सोलापूर ः तो चक्क सापाला एका काटयामध्ये अडकवून त्याचे लचके तोडत होता. अत्यंत आक्रमक शिकारी असलेल्या राखी खाटीकची ही शिकार अंगावर शहारे आणणारी ठरली. 
जिवंत सापाला लचके तोडून खाणाऱ्या राखी खाटीक पक्ष्याच्या शिकारीचा अनुभव निसर्गमित्र शिवानंद हिरेमठ सांगत होते. 
आज माळरानात निसर्ग निरीक्षण करताना अचानक माझ्या डावीकडून राखी खाटीक (साउदर्न ग्रे श्राईक) उजवीकडे एका काटेरी झाडावर जाऊन बसला. अगदी 10 फुटावरून तो उडाला होता. उडताक्षणीच मी समजून चुकलो होतो की याने सापाची शिकार केली आहे. माझ्या समोर सूर्यप्रकाश आणि राखी खाटीक याचा शेपटीचा भाग आला. त्यामुळे फोटो काढून पण उपयोग नव्हता. मी क्षणाचाही विचार न करता त्याला समांतर गाडी घेऊन गेलो. गाडी बंद केली तर तो उडून जाईल हा एक विचार करतच बॅगमधून कॅमेरा काढला. तो उडून जाऊ नये म्हणून मनाची घालमेल चालू होती. कारण गेल्या कित्येक वर्षांपासून राखी खाटिक सापाची शिकार करतो हे ऐकून होतो. काही लोकांची छायाचित्रे पाहिली होती. आज तो क्षण मी डोळ्याच्या कॅमेरामध्ये क्‍लिक केलेलाच होता. 
कॅमेरा हातात घेऊन फोकस करून मोजून 8 ते 10 सेकंद गेला असेल तिथून हा उडाला व तोपर्यंत लांब दुसऱ्या झाडावर जाऊन बसला. मला खात्री होतीच की तिथे ती काट्यामध्ये सापाला अडकावून खाणार आहे. कारण या अगोदर त्याच्या खाद्याच्या पध्दतीचे निरीक्षण केलेलं आहे. 
तो पक्षी बसलेल्या ठिकाणी गेलो. त्याठिकाणी झाडावर एका काट्यामध्ये सापाला अडकावून हा त्याचे लचके तोडून खात होता. साप जिवंत होता त्याची शेपूट वळवळत होती आणि हा त्याचे लचके तोडत होता. कोणालाही हा प्रकार पाहून कसतरी वाटेल पण निसर्गामध्ये असे काही शिकार करणारे पक्षी आहेत त्यांचा हा उपजत गुणच आहे. 
माळरानावर सर्वात घातक आणि कोणतीही दयामाया न दाखवता शिकार करण्याची पद्धत ही राखी खाटीकची पध्दत आहे या पक्ष्याने पकडलेला साप हा धुळनागिण या बिनविषारी सापाचा पिल्लू होते. साधारण एक फूट आकाराचे हे पिल्लू राखी खाटीकने संपवले. 


ओळख राखी खाटीकची 
- हा पक्षी स्थानिक माळरानाचा पक्षी 
- मुख्य खाद्य सरडे, साप सुरळी, भाविक व माळ टिटवी या पक्ष्यांची पिल्ले, नाकतोडा व पक्ष्यांची अंडी 
- या शिवाय तो जरबिल या उंदराच्या प्रकार, मांजराची पिल्ले, काळी मुंगी हे ही त्याचे भक्ष्य 
- माळरानावर आढळणारे वैभव जपणे आवश्‍यक  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com