मंगळवेढ्यात बायपास असूनही अवजड वाहतूक शहरातूनच 

हुकुम मुलाणी 
Saturday, 31 October 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मुजम्मील काझी शहरात जड वहातूक बंद करण्याच्या उद्देशाने गार्ड टॉवर बसवण्याबाबत नगरपरिषदेने 24 ऑगस्टला पत्र दिले तब्बल दोन महिन्याचा कालावधी नंतर आजतागायत गार्ड बसवण्यात आले नाहीत. शहरातील विविध संघटनांनी पोलीसाकडे वारंवार तक्रार व विनंतीवजा सांगून देखील जड वाहतुकीवर आळा बसत नसेल तर आजून किती लोकांना आपले प्राण गमवावे लागेल म्हणजे प्रशासनास जाग येईल.

मंगळवेढा : अवजड वाहतूक शहराच्या बाहेरून जाण्यासाठी बायपास मार्ग असताना देखील ही वाहने शहरात प्रवेश करत असल्यामुळे अपघातचे प्रमाण वाढू लागले. शिवाय वाहतुकीचे नियम मोडणारांचे प्रमाण वाढल्यांमुळे पोलिसांवरील ताण वाढत आहे. 

सध्या महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे वरवर छोटे-मोठे अपघाताचे प्रमाण सुरूच आहे अशा परिस्थितीत पंढरपूर वरून येणारी वाहने बाह्यवळण मार्गे विजापूरला झाले आवश्‍यक आहे तसेच सोलापूर कडून येणारी वाहने देखील बाह्यवळण मार्गाने मिरज, सांगली, कोल्हापूरकडे जाणके आवश्‍यक असताना काही वेळा ही वाहने शहरात प्रवेश करतात शहरांमध्ये प्रवेश केल्यानंतर चांगल्या रस्त्यामुळे छोटे अपघात होऊन बळी गेले आहेत. काल देखील तसाच बळी गेला. दामाजी पंतांच्या पुतळ्यापासून ते पंढरपूर रोड बायपासपर्यंत इंग्लिश स्कूल माध्यमिक शाळा, पंचायत समिती, पोलिस स्टेशन, बस स्थानक, बॅंक ऑफ इंडिया, भारतीय स्टेट बॅक, जि. प. बांधकाम व पाणीपुरवठा कार्यालय, पेट्रोल पंप, महावितरणचे कार्यालय, घरगुती साहित्य खरेदी-विक्रीसाठी दोन मोठे मॉल, कृषी उत्पन्न बाजार समिती अधिक कार्यालय या मार्गावरील असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बाह्यवळण मार्गाने जाणे आवश्‍यक आहे. परंतु पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही वाहने शहरात येऊन अपघातामध्ये भर टाकत आहेत. त्यात सर्वसामान्यांचा बळी जात आहे. 

सध्या रत्नागिरी नागपूर महामार्गावरील खोमनाळ, मरवडे, पाठखळकडे जाणाऱ्या रस्त्यावर बोगद्याजवळील ठिकाणे सध्या धोकादायक बनली आहेत. या ठिकाणी संबंधित ठेकेदाराने देखील लक्ष देणे आवश्‍यक आहे. तालुक्‍यात तीन साखर कारखाने असून सध्या गाळप सुरू असल्याने ट्रॅक्‍टर भरधाव वेगाने शहरातूनच वाहतूक करत आहेत. याकडे कारखाना व्यवस्थापन व पोलिस प्रशासनाने लक्ष देणे आवश्‍यक असून या नंतर बळी जाणार नाहीत याबाबत सर्व स्तरावर प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मुजम्मील काझी शहरात जड वहातूक बंद करण्याच्या उद्देशाने गार्ड टॉवर बसवण्याबाबत नगरपरिषदेने 24 ऑगस्टला पत्र दिले तब्बल दोन महिन्याचा कालावधी नंतर आजतागायत गार्ड बसवण्यात आले नाहीत. शहरातील विविध संघटनांनी पोलीसाकडे वारंवार तक्रार व विनंतीवजा सांगून देखील जड वाहतुकीवर आळा बसत नसेल तर आजून किती लोकांना आपले प्राण गमवावे लागेल म्हणजे प्रशासनास जाग येईल. गार्ड टॉवर बसवावेत अन्यथा होणा-या प्रत्येक घटनेस प्रशासनास जबाबदार धरण्यात येईल. 

कारवाई करणाऱ्या पोलिसांनाच धाक 

कोरोनाचा अटकाव रोखण्यासाठी शासनाने सुधारित दराप्रमाणे शंभर रुपये ऐवजी पाचशे रुपये दंड केला आहे. त्यामुळे या दंडाचे या नियमाचे पालन करण्यासाठी पोलीस अधिकारी रस्त्यावर थांबले असता बिगर मास्क दुचाकीस्वारांनी पोलिसांनाच नोकरी घालण्याची धमकी दिली. त्यामुळे अशा घटनांमुळे पोलिसांचे मनोबल खच्चीकरण होत आहे त्यासाठी पोलिसांनी प्रसंगी आपला धाक निर्माण होईल अशा पद्धतीने कडक कारवाई करण्याची गरज आता निर्माण झाली. 

संपादन : अरविंद मोटे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy traffic in the city despite the bypass on Mars