गरजेवेळी मदत करणे हीच खरी माणुसकी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

कोरोनामुळे आज समाजातील प्रत्येक घटक अडचणीत सापडला आहे. अनेकांची जगण्यासाठी धडपड चालू आहे. अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या अनेक गरजा आज निर्माण झाल्या आहेत.

सोलापूर : कोरोनामुळे आज समाजातील प्रत्येक घटक अडचणीत सापडला आहे. अनेकांची जगण्यासाठी धडपड चालू आहे. अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या अनेक गरजा आज निर्माण झाल्या आहेत. अशा गरजेवेळी मदत करणे हीच खरी माणुसकी आहे, असे प्रतिपादन दीपकभाऊ निकाळजे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांनी केले. 

वीरशैव व्हीजनच्या वतीने आर. एस. मालू ट्रस्ट संचलित मंगलदृष्टी भवन वृद्धाश्रम येथील दहा वृद्ध महिलांना औषधोपचारासाठी आर्थिक मदत देण्यात आली. या वेळी श्री. तालिकोटी बोलत होते.

या वेळी शांतिसागर युवा संघटनेचे सहसचिव सुहास छंचुरे, वीरशैव व्हीजनचे संस्थापक- अध्यक्ष राजशेखर बुरकुले, आस्था रोटी बॅंकेचे संस्थापक विजय छंचुरे, सहकोषाध्यक्ष विजय बिराजदार, वृद्धाश्रमाच्या कार्यवाह रजनी भाटिया, महिला आघाडी अध्यक्षा वर्षा काशेट्टी, सचिवा माधुरी बिराजदार, उत्सव समिती अध्यक्ष सोमेश्वर यावाजी, युवक अध्यक्ष विजयकुमार हेले, सिद्राम बिराजदार, संजय साखरे, आनंद दुलंगे, राजेश नीला, दीपक बडदाळ, राजश्री गोटे, पल्लवी हुमनाबादकर, सुचित्रा बिराजदार आदी उपस्थित होते. 

या वेळी रजनी भाटिया म्हणाल्या, समाजात काही माणसे फुलासारखी असतात. ती माणसे दुसऱ्यांचे आयुष्य सुंदर व सुगंधित करतात. त्याप्रमाणे वीरशैव व्हिजनने वृद्धाश्रमातील महिलांना औषधोपचारासाठी रोख स्वरूपात मदत करून त्यांना आनंद मिळवून दिला आहे. हे निश्‍चितच कौतुकास्पद आहे.

व्हीजनतर्फे मंगलदृष्टी वृद्धाश्रम येथील काशीबाई काळे, कमलबाई कोलते, कलावती पुट्टा, गंगाबाई एडके, उषा पोबत्ती, ललिता सलगर, शोभा वाडेकर, नागरबाई वाघमारे, रजनी भाटिया या दहा वृद्ध महिलांना औषधोपचारासाठी प्रत्येकी 500 रुपये याप्रमाणे पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली.

 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिव कलशेट्टी, बसवराज चाकाई, सोमनाथ चौधरी, अविनाश हत्तरकी, धानेश सावळगी, चेतन लिगाडे, राहुल बिराजदार, बसवराज जमखंडी, बसवराज बिराजदार, अमित कलशेट्टी, केतन अंबुलगे, अमोल कोटगोंडे, सिद्धेश्वर कोरे यांनी परिश्रम घेतले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Helping in times of need is the true humanity