
सोलापूर : महापालिकेत मोठी ताकद असलेल्या महेश कोठेंनी पक्षांतर्गत कुरघोडीला वैतागून राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट धरली. कोठे शिवसेनेत येण्यापूर्वी महापालिकेत पक्षाचे संख्याबळ सात ते नऊ एवढेच होते. कोठेंनी कॉंग्रेस सोडली आणि शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महापालिकेत हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर पोहचला. मात्र, आता कोठेंनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतल्याने महापालिकेतील स्थान टिकविण्यासाठी पक्षाला कसरत करावी लागणार आहे. तत्पूर्वी, कोठेंना पक्षांतरापासून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे थांबवतील का, याची उत्सकता लागली आहे.
शासकीय इंजिनिअरिंग महाविद्यालयाची नुसतीच घोषणा
सोलापुरात शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालय असून याठिकाणी शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे मंत्री सामंत यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. मात्र, त्यासंदर्भात शासनस्तरावरुन पुढे काहीच हालचाली झाल्या नसल्याच्या चर्चा आहेत. तर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी दोन कोटींचा निधीही सांमत यांनी जाहीर केला. परंतु, अद्याप एक दमडाही मिळाला नसल्याने स्मारकाचे ना उद्घाटन ना कामाला सुरवात झाली. त्यासंदर्भात आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री काय बोलणार, याची उत्सुकता आहे.
राज्याच्या सत्तेची दोरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे असतानाही पदाधिकाऱ्यांनी सांगितलेली कामे होत नसल्याने पक्षांतर्गत गटतट वाढू लागले आहेत. दुसरीकडे आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत विरोधकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी कायम ठेवण्याची गरज आहे. मात्र, शहरात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना नेत्यांचे सूत अद्याप जुळेलेले नाही. शरीराने एकत्रित येणारे नेते मनाने मात्र, दुरावलेलेच असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी बरडे-कोठे यांच्यातील वाद, आता मनोहर सपाटे आणि कोठे यांच्यातील कलगीतुरा, यातून ते स्पष्ट झाले आहे. तिन्ही पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्याच पक्षात राहावेत, गटतटाच्या राजकारणाला बळ मिळू नये, याकडेही लक्ष द्यायला हवे. दरम्यान, कोठे हे राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर त्यांचे समर्थक नगरसेवक त्यांच्यासोबत जाणार नाही, यादृष्टीने मंत्री सामंत पदाधिकाऱ्यांना कसे मार्गदर्शन करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.