सोलापूरच्या ग्रामीण भागात आज सर्वाधिक 462 कोरोनाबाधित 

संतोष सिरसट 
Sunday, 6 September 2020

सोलापूर ः जिल्ह्यात आज सर्वाधिक 462 जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर आज पुन्हा 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आज स्पष्ट झाले. 

सोलापूर ः जिल्ह्यात आज सर्वाधिक 462 जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर आज पुन्हा 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आज स्पष्ट झाले. 

आज तीन हजार 853 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी तीन हजार 391 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 462 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हा आकडा आतापर्यंत सर्वाधिक आहे. त्याचबरोबर आज पुन्हा एकदा कोरोनाने 13 जणांचा बळी घेतला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज दुधनी (ता. अक्कलकोट) येथील 56 वर्षाचे पुरुष, दत्तनगर मोहोळ येथील 60 वर्षाचे पुरुष, सनगर गल्ली बार्शीतील 67 वर्षाचे पुरुष, सांगवी बिटरगाव (ता. करमाळा) येथील 71 वर्षाचे पुरुष, शेळगाव (ता. बार्शी) येथील 73 वर्षाचे पुरुष, वैराग येथील 60 वर्षाची महिला, गाडेगाव रोड बार्शीतील 63 वर्षाची महिला, तांबेवाडी (ता. माढा) येथील 71 वर्षाचे पुरुष, कुर्डूवाडी येथील 65 वर्षांचे पुरुष, वैराग येथील 74 वर्षाचे पुरुष, कामती बुद्रुक (ता. मोहोळ) येथील 65 वर्षाचे पुरुष, कासारवाडी रोड बार्शीतील 59 वर्षाचे पुरुष तर महाद्वार रोड पंढरपूर येथील 65 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता 395 एवढी झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 13 हजार 672 जण बाधित झाले आहेत. 

या गावांमध्ये आढळले कोरोनाबाधित रुग्ण 
करमाळ्यातील भवानी पेठ, भिमनगर, गुळसडी, घोलप नगर, हिरडे प्लॉट, जातेगाव, जेऊर, कैकाडी गल्ली, खडकी, खाटगाव, कृष्णाजी नगर, कुंकू गल्ली, महेंद्र नगर, मेन रोड करमाळा, पोमलवाडी, सालसे, सरपडोह, सावंत गल्ली, शेळगाव वांगी, सुमंत नगर, तहसील कार्यालय, वीट, विहाळ, बार्शीतील आदित्य कृष्णनगर, अलीपूर रोड, बालाजी नगर, बारंगुळे प्लॉट, बारबोले प्लॉट, बावी, भाजीमंडई, भांडेगाव, भवानी पेठ, कॅन्सर हॉस्पिटल, चारे, दत्तनगर, धावणे गल्ली, धस पिंपळगाव, फुले प्लॉट, गाडेगाव रोड, घाणेगाव, घोस्त गल्ली, गोंडील प्लॉट, गोरमाळे, जावळी प्लॉट, कासार गल्ली, कासारवाडी रोड, कसबा पेठ, लहुजी चौक, लोखंड गल्ली, मांडेगाव, मंगळवार पेठ, नागणे प्लॉट, नाळे प्लॉट, जुने रेल्वे स्टेशन जवळ, पाटील प्लॉट, पवार प्लॉट, पिंपळवाडी, राऊत गल्ली, रिंग रोड, साई नगर, सौंदणे, सोलापुर रोड, सुभाष नगर, तुळजापूर रोड, उपळाई रोड, वाणी प्लॉट, माढ्यातील अरण, बावी, भोसरे, चांदवडी, चिंचगाव, धानोरे, कन्हेरगाव, कसबा पेठ, कुर्डू, कुर्डूवाडी, महतपूर, मानेगाव, परिते, रोपळे, संमती नगर, तांदुळवाडी, टेळे गल्ली, टेंभुर्णी, वेताळ पेठ, वाकाव, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, आनंदनगर, बागेचीवाडी, भांबुर्डी, बोंडले, बोरगाव, कोर्टासमोर माळशिरस, दहीगाव, धर्मपुरी, घाडगे गल्ली, गुरसाळे, करुंडे, खळवे, महाळुंग, माळेवाडी, माळीनगर, मोरोची, नातेपुते, नेवरे, शहा दर्शी, श्रीपूर, यशवंनगर, मंगळवेढ्यातील दामाजी नगर, डांगे गल्ली, खुपसंगी, कृष्णनगर, कुंभार गल्ली, मानेवाडी, मित्रनगर, नागणेवाडी, केळकर गल्ली, शेंबडे गल्ली, शिवाजी तालीम, मोहोळ मधील अनगर, औंढी, भांबेवाडी, दत्तनगर, देवडी, कंदलगाव, मेहबूब नगर, यावली, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील गावडी दारफळ, कौठाळी, पंढरपुरातील अनिल नगर, भाळवणी, भोसे, चैतन्यनगर, चिलवडी, दाळे गल्ली, देगाव, डोंबे गल्ली, फत्तेपुर नगर, गोकुळ नगर, गोपाळपूर, गुरसाळे, इसबावी,,करकंब, कासेगाव, खरसोळी, खेड भोसे, किष्ठे गल्ली, कोर्टी, लक्ष्मी टाकळी, लिंक रोड, महावीर नगर, मयुरेश आपार्टमेंट, नारायण चिंचोली, नवी पेठ, बंकटस्वामी मठाजवळ, कालिका मंदिराजवळ, वैभव ऑइल मिल जवळ, पांढरवाडी, परदेशी नगर, पुळूज, रांजणी, सह्याद्रीनगर, संभाजी चौक, सरकोली, शेंडगेवाडी, सिद्धिविनायक सोसायटी, ताकभाते वाडा, ठाकरे चौक, उंबरगाव, उत्पात गल्ली, विठ्ठल हॉस्पिटल क्वार्टर, वाखरी, सांगोल्यातील अलराईन नगर, बामणी, भीम नगर, जाधववाडी, चिकमहुद, देशपांडे गल्ली, एकतपूर, घेरडी, हिंगमिरे, कडलास नाका, कमलापूर, कटफळ, खडतरे गल्ली, कोळा, गोष्टी गल्ली, कुंभार गल्ली, लक्ष्मीनगर, लोहार गल्ली, महूद, मनेरी, मेडशिंगी, मिरज रोड, परीट गल्ली, पुजारवाडी, शिवाजी नगर, शिवणे, सांगोला महाविद्यालयाजवळ, सब जेल सांगोला, वज्रबाद पेठ, वासूद रोड, यलमार मंगेवाडी, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील भंडारकवठे, बिर्ला सिमेंट होटगी स्टेशन, चेट्टीनाड सिमेंट, तीर्थ, विडी घरकुल याठिकाणी आज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The highest number of 462 corona affected in rural areas of Solapur today