
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात शनिवारपर्यंत (ता. 17) अतिवृष्टीचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. मंगळवारी रात्रीपासूनच सोलापूर शहर व जिल्ह्यात पावसाने ठिकठिकाणी दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी सकाळी साडेआठ ते आज (बुधवारी) सकाळी साडेआठ पर्यंतच्या आकडेवारीनुसार सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 75.8 मिलि मीटर पावसाची नोंद अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव महसूल मंडळात झाली आहे.
या पावसाचा सर्वाधिक फटका अक्लकोट तालुक्याला बसला आहे. चपळगाव महसूल मंडळा खालोखाल अक्कलकोट तालुक्यातील जेऊर महसूल मंडळात 75.0 मिलिमीटर, अक्कलकोट महसूल मंडळात 73.3 मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 41.6 मिलि मीटर पाऊस अक्कलकोट तालुक्यात झाला आहे. आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 21.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
अन्य महसूल मंडळातील पाऊस या प्रमाणे : शेळगी : 48.8, मार्डी : 36.8, वडाळा : 57.0, सोलापूर : 41.0, बोरामणी : 45.5, मंद्रूप : 38.3, वैराग : 45.5, करजगी : 58.5, दुधनी : 50.3, वागदरी : 41.6, सावळेश्वर : 46.0, कामती : 38.8, टाकळी : 31.8, पेनूर : 29.5, वाघोली : 33.5, नरखेड : 36.3, शेटफळ : 25.0, मोहोळ : 39.3, माढा : 22.0, दारफळ : 23.3, कुर्डूवाडी : 22.8, टेंभुर्णी : 21.5, मोडनिबं : 24.0, लऊळ : 23.5, पंढरपूर : 27.5, पुळुज : 35.3, चळे : 32.8, तुंगत : 27.3, कासेगाव : 28.5, संगेवाडी : 24.3. माळशिरस तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात 20 मिलिमीटरच्या आतील पावसाची नोंद आहे. मंगळवेढा तालुक्यातील मारापूर : 36.8, हुलजंती : 31.5, आंधळगाव : 32.3, मरवडे : 24.5, बोराळे : 24.0 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.