Breaking ! सोलापूर महापालिकेने केली गणेश मूर्तीची विटंबना; "यांनी' दिली पोलिसांत तक्रार 

तात्या लांडगे 
Tuesday, 1 September 2020

शहरातील संकलित गणेश मूर्ती वाहनात भरून आणून त्या सर्व मूर्ती खाणीत टाकण्यात आल्या. या वेळी प्रशासकीय यंत्रणेकडून विटंबनात्मक विसर्जन करण्यात आल्याचा आरोप हिंदू महासभा व बजरंग दलाने केली आहे. या प्रकरणी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. महापौर, आयुक्त आणि नगर अभियंता यांच्यासह संबधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

सोलापूर : कोरोनामुळे यंदा गणेश विसर्जन व मिरवणुकांवर निर्बंध घालण्यात आले आहे. विसर्जनावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने धर्मवीर संभाजीराजे तलाव व श्री सिद्धेश्वर तलावात विसर्जनास बंदी घातली. या पार्श्वभूमीवर महापालिकेने तुळजापूर रोडवरील दगडी खाण येथे विसर्जनाची सोय केली होती. मात्र, शहरातील संकलित मूर्ती वाहनात भरून आणून त्या सर्व मूर्ती खाणीत टाकण्यात आल्या. या वेळी प्रशासकीय यंत्रणेकडून विटंबनात्मक विसर्जन करण्यात आल्याचा आरोप हिंदू महासभा व बजरंग दलाने केली आहे. या प्रकरणी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. महापौर, आयुक्त आणि नगर अभियंता यांच्यासह संबधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

हिंदू महासभा व बजरंग दलाचे सुधीर बहिरवाडे यांच्यासह अन्य पदाधिकारी आक्रमक झाल्यानंतर महापालिकेने काही कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून खाणीच्या कडेला अडकून पडलेल्या मूर्ती पुन्हा पाण्यात सोडल्या. नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करीत बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hindu Mahasabha and Bajrang Dal lodge complaint with police against Solapur Municipal Corporation for desecration of Ganesh idols