
सोलापूर ः शहरातील नॉन-कोविड रुग्णांना सेवा देण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशने दवाखान्यांची यादी जिल्हा प्रशासनाला सादर केली आहे. हे दवाखाने सकाळी सहा ते रात्री दहा या कालावधीत सुरु असून आपत्कालीन रुग्णांना स्विकारले जाईल. नियमित रुग्णांसाठी बाहयरुग्णसेवा हॉस्पिटलच्या वेळेनुसार सुरु राहील असेही आयएमएने सांगितले आहे.
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आयएमएच्या प्रतिनिधींना दवाखाने सुरु ठेवण्याबाबत सूचना केल्या होत्या. सर्व नोंदणीकृत खासगी रुग्णालय व दवाखाने सुरू करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आयएमएकडून शहरातील रुग्णालयांची यादी व हेल्पलाइन क्रमांक जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. आयएमएचे अध्यक्ष डॉ. हरीश रायचूर आणि सोलापूर हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुदीप सारडा यांनी ही यादी दिली आहे. रात्री 10 ते सकाळी सहा या वेळेतही काही हॉस्पीटलमध्ये तातडीची रुग्णसेवा मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यातील नऊ हजार 580 खाटा अधिसूचित
कोरोना विषाणू बाधितांवर प्रभावी वैदकीय उपचारासाठी शहर आणि जिल्ह्यातील खासगी दवाखानातील नऊ हजार 580 खाटा जिल्हा प्रशासनाने अधिसूचित केल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. श्री. शंभरकर म्हणाले, राज्य शासनाच्या 21 मेच्या अधिसूचनेनुसार सर्व रुग्णालयांच्या 80 टक्के खाटा अधिसूचित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सोलापूर शहर हद्दीतील 332 रुग्णालयातील चार हजार 932 खाटा अधिसूचित केल्या आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अधिपत्याखालील 143 खासगी दवाखान्यातील दोन हजार खाटा अधिसूचित केल्या आहेत. जिल्हा आरोग्य विभागाकडे 345 खासगी दवाखान्यातील दोन हजार 558 खाटा अधिसूचित करण्यात आल्या आहेत.
रात्री 10 ते सकाळी सहा या वेळेत या दवाखान्यात मिळेल तातडीची रुग्णसेवा
हॉस्पिटलची नावे आणि हेल्पलाईन क्रमांक
-अश्विनी हॉस्पिटल ः 0217-2319900/5, संपर्क व्यक्ती: 9552555041
-मार्कंडेय सहकारी रुग्णालय ः 0217- 2452018
-यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ः 0217-2323001/2
अस्थिरोगतज्ञ:
-कोठाडिया नर्सिंग होम ः 9689999711,
-शाश्वत हॉस्पिटल ः 0217-2727057/ 8551887057
-येमुल ऑर्थोपेडिक सेंटर ः 9172836652/ 3550006
-मोनार्क हॉस्पिटल ः 7721800018
-डॉ. चिडगुपकर हॉस्पिटल ः 0217-2326841
-शुश्रुत क्लिनिक ः 0217-2318141/0217-2318142
न्यूरोलॉजी
-एस. पी. इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स ः 9823714872/ 9175988840
-सी. एन. एस. हॉस्पिटल ः 0217-2728877/ 9322088000
-एस. एस. बलदावा न्यूरोसायन्स् ः 9067770015
बालरोगतज्ञ
-स्पॅन हॉस्पिटल ः 0217-2728033
-चिरायू मुलांचे हॉस्पिटल ः 0217-2620800
-शाश्वत हॉस्पिटल ः 0217-2727057/ 8551887057
-सौ. जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक ः 0217-2627447
जनरल सर्जरी
-मोनार्क हॉस्पिटल ः 7721800018
ऱ्हदयरोगतज्ञ
-पेक्स हॉस्पिटल ः 0217-2600602/2600603,9545277222
स्त्रीरोगतज्ञ
जिथे नोंद झाली आहे, अशा स्त्रीरोगतज्ञाकडे संपर्क साधावा. नोंद झाली नसल्यास अश्विनी ग्रामीण रुग्णालय व मेडिकल कॉलेज येथे 9849633578/ 9423869563 या नंबरवर संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.