Janta curfew : श्री विठ्ठल- रूक्मिणी मंदिर बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

चंद्रभागेच्या तीरावर दररोज भाविकांची गर्दी होत असते तिथेदेखील आज जनता कर्फ्यू मुळे निरव शांतता आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर प्रदक्षिणामार्ग बस स्थानक रेल्वे स्थानक स्टेशन रोड अशा सर्वच भागातील दुकाने बंद आहेत.

पंढरपूर (सोलापूर) : श्री विठ्ठलाच्या दर्शनाच्या निमित्ताने दररोज राज्याच्या कानाकोपऱ्यातून ३० ते ४० हजार भाविक येत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल- रूक्मिणी मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे परगावाहून श्री विठ्ठलाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या नगण्य झाली आहे.
चंद्रभागेच्या तीरावर दररोज भाविकांची गर्दी होत असते तिथेदेखील आज जनता कर्फ्यू मुळे निरव शांतता आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर प्रदक्षिणामार्ग बस स्थानक रेल्वे स्थानक स्टेशन रोड अशा सर्वच भागातील दुकाने बंद आहेत. जनता कर्फ्यूला पंढरपुरातील स्थानिक नागरिक आणि परगावाहून येणारे भाविक यांच्याकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे चित्र दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hundred percent response to janta curfew in Pandharpur