
सोलापूर : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार नाना पटोले, कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे व इतर कार्याध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे शुक्रवार (ता. 12 फेब्रुवारी) रोजी दुपारी 2.30 वाजता ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान मुंबई येथे, आयोजित कार्यक्रमात पदभार स्वीकारणार आहेत. सोलापूरच्या तरुण तडफदार आमदार प्रणिती शिंदे या आता राज्याचे नेतृत्व करणार असल्याने सोलापूरमधील कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातारण असून शेकडो कार्यकर्ते बुधवारी मुंबईत दाखल झाले आहेत.
प्रदेशाध्यपदाचा पदभार स्वीकारण्याचा जाहीर कार्यक्रम अनेक वर्षात प्रथमच होत आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी 1942 मध्ये मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातून इंग्रजांना " अंग्रजो चलो जावो, भारत छोडो' हा नारा देत स्वातंत्र्यांच्या निर्णायक लढ्याची सुरुवात केली होती. त्याच ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात पदग्रह कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमात नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समवेत आमदार प्रणिती शिंदे या कार्याध्यक्षप पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे नाना पटोले यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवतील. यावेळी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, राज्यातील कॉंग्रेस पक्षाचे सर्व जेष्ठ नेते, राज्य मंत्रिमंडळातील कॉंग्रेसचे मंत्री, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दु. आ, बी. एम. संदीप, वामशी रेड्डी, संपत कुमार, सोनल पटेल, यांच्यासह कॉंग्रेस पक्षाचे आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
नाना पटोले यांनी (4 फेब्रुवारी) रोजी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्या नंतर (5 फेब्रुवारी रोजी) कॉंग्रेसने प्रदेशाध्यक्षपदी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली होती. त्यानुसार आता ते (ता.12 फेब्रुवारी) रोजी अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष व उपाध्यक्षही पदभार स्वीकारणार आहेत. पटोलेंना सहकार्य करण्यासाठी सहा कार्याध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात माजी मंत्री शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहम्मद अरीफ नसीम खान, आमदार कुणाल पाटील, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि आमदार प्रणीती शिंदे यांना कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहे. याशिवाय उपाध्यक्ष म्हणून शिरीश चौधरी, रमेश बागवे, हुसेन दलवाई, मोहन जोशी, रणजित कांबळे, कैलास गोरंट्याल, भा. ई. नगराळे, शरद आहेर, एम. एम. शेख आणि माणिक जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गिरगाव चौपटी ते ऑगस्ट क्रांती मैदान बैलगाडीने प्रवास
सकाळी सर्व कार्यकर्ते मंत्रालयाजवळ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करून हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना वंदन करतील. नंतर दक्षिण मुंबई व विधानभवनातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करणार आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ट्रॅक्टरने प्रवास करुन गिरगाव चौपाटीला पोहचतील. तेथील लोकमान्य टिळक व सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर इंधन दरवाढ व वाढती महागाई या ज्वलंत प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गिरगाव चौपटी ते ऑगस्ट क्रांती मैदान हा प्रवास ते बैलगाडीने करतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.