
सोलापूर : स्थलांतरीत पक्ष्यांचे आश्रयस्थान असलेल्या सोलापूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या शिकारीची प्रकरणे अधूनमधून सातत्याने उघडकीस येत आहेत. काही दिवसापूर्वी दक्षिण सोलापूर तालुक्यातील संगदरी येथे साळींदरची शिकार केल्याप्रकरणी (ता. 6) रोजी एकाला अटक करण्यात आली होती. शनिवार (ता. 7) रोजी याप्रकरणातील संशयित सिद्राम महादेव विभूते (वय 32, रा. बहुरुपी नगर, माशाळवस्ती सोलापूर) यास जामीन मंजूर करण्यात आला आहे.
कधी काळी सोलापूर जिल्हा सूची क्रं. 1 मधील माळढोक पक्षांच्या आश्रयस्थान होता. सध्या हिप्परगा तलाव, होटगी तलाव, धर्मवीर संभाजी तलाव, स्मृतीवन व सिद्धेश्वर वनविहार ही ठिकाणे स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रसिध्द आहेत. तसेच सोलापूर शहराला अगदी लगत असलेल्या नान्नज अभयराण्यात हरीण, काळविट, ससा, खोकड आदी प्राण्यांचा मोठ्या संख्येने वावर आहे. जिल्ह्यातील वन्यसंपदा धोक्यात असून वनखात्याकडून लोकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
(ता. 6) रोजी दुधनी-अक्कलकोट रस्त्यावर सिद्राम महादेव विभुते (वय 32) यास कर्नाटकातील शहापूर येथे येत असताना साळींदर हा प्राणी मृतावस्थेत सापडला. त्याने मृत साळींदर प्राणी घरी आणून त्याचे काटे काढून मांसाचा वापर खाण्यासाठी केला असण्याचा संशय आहे. या याप्रकरणी सिद्राम महादेव विभुते याच्याकडून काटे उपसण्यासाठी वापरण्यात आलेली पक्कड व मांस सापडले असून, संशयितास अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवासांच्या वन कोठडीनंतर जामीन देण्यात आला. ही कारवाई सहाय्यक वनसंरक्षक श्री. शेख यांच्या मागर्दशनाखाली शंकर कुताते, एस. एस. कोरे, विधाते, भुई, गंगाधर कणबस यांनी या कारवाईत भाग घेतला.
साळींदर बिबट्याचे आवडते खाद्य
साळींदर हा निशाचर प्राणी असून, ऊस शेतीच्या ठिकाणी त्याचा मोठ्या प्रमाणात रहिवास असतो. हा प्राणी वनखात्यचा सूची चारमध्ये येत असून, साळींदर मारण्यास अथवा मृत प्राण्याचे मांस बाळगणे, विक्री करणे हा गुन्हा आहे. साळींदर हा प्राणी बिबट्याचे सर्वात आवडते खाद्य आहे.
वनखात्याने अधिसूचित केलेले प्राणी
सूची 1
माळढोक
लांडगा
मोर
काळवीट
घोरपड
कासव
सूची 2
कोल्हा
रानमांजर
खोकड
मुंगूस
रंग बदलणारा सरडा
पाणदिवड, विरोळा
धामण साप
नाग
घोणस
सूची 3
रान डुक्कर
तरस
नीलगाय
सूची 4
ससा
साळिंदर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.