
सोलापूर : नाकोडा युनिटी रेसिडेन्सी येथील श्रीकांत सुरेंद्रकुमार लड्डा यांनी परशुराम पवार (रा. तानाजी गल्ली, अंगळ बेळगाव, कर्नाटक) याला दोन लाख आठ हजार 500 रुपये तर सनी सिंग (रा. एसपीएम रोड, सेंकड क्रॉस) याला पाच लाख 42 हजार रूपये हातउसने दिले. त्यांना रक्कम परत मागितली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत विश्वसघात केल्याची फिर्याद लड्डा यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली.
लड्डा यांच्या फिर्यादीनुसार परशुराम पवार, सनी सिंग, फिर्यादीची पत्नी पूजा या तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पवार आणि सिंग हे दोघेही फिर्यादी लड्डा यांची पत्नी पुजाचे मित्र आहेत. तिच्या सांगण्यावरून लड्डा यांनी त्या दोघांना एकूण साडेसात लाख रुपये दिले. मात्र, आता परत मागितल्यानंतर त्यांनी संगनमत करून पैसे परत दिले नाहीत, असेही लड्डा यांनी पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस नाईक श्री. चव्हाण हे करीत आहेत.
विकत घेतलेला गाळा
ताब्यात घेताना जीवे मारण्याची धमकी
सोलापूर : सवेरा नगरातील (वियजपूर रोड) जीवन शिवप्पा जाधव यांनी मोहन व्हसुरे यांच्याकडून सिध्देश्वर को-ऑप. हौसिंग सोसायटीतील गाळा सात लाख 12 हजार रुपयाला विकत घेतला. गाळा नावावर झाल्यानंतर दहा-बारा दिवसांनी जाधव हे ताबा घेण्यासाठी त्याठिकाणी गेले. मात्र, मोहन व्हसुरे, नंदकुमार मेटकरी व त्याची पत्नी आणि चंदू मेटकरी या चौघांनी अडविले. त्यावेळी त्यांनी गाळा खाली करण्यासाठी पाच लाख रूपये घेऊन या, पैसे न आणता तुम्ही गाळ्याकडे फिरकलात तर तुमचे पाय तोडतो, अशी धमकी दिली. पोलिसांत गेल्यास तुला खल्लासच करतो, अशीही धमकी दिल्याचे जाधव यांनी विजापूर नाका पोलिसांना सांगितले. त्यानुसार त्या चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला असून पोलिस नाईक श्री. गावडे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
जमिनीचे आठ लाख रुपये मागितले;
पाचजणांकडून जीवे ठार मारण्याची धमकी
सोलापूर : कोन्हाळी (ता. अक्कलकोट) येथील रमेश तुकाराम जाधव यांच्या भावाकडून व बहिणीकडून अनिल लक्ष्मण जाधव, सुभाष राठोड, शिवानंद किसन बंडगर, सचिन नामदेव पिसे आणि सचिन यांनी 16 लाख रुपयास जमीन खरेदी करून घेतली. आठ लाख रुपये अजूनही दिले नसून त्याची मागणी केल्यानंतर त्यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद रमेश जाधव यांनी सदर बझार पोलिसांत दिली. त्यावरून पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
चार एकर 13 गुंठे जमीन ठार मारण्याची धमकी देऊन 16 लाखास खरेदी करून घेतली. त्यातील आठ लाख रुपये दिले असून उर्वरित रक्कम मागणीसाठी 5 मार्चला अनिल जाधव याच्याकडे गेले. त्यावेळी त्यांना शिवीगाळ करून तुला जिवंत राहायचे नाही का, माझी माणसे कशी आहेत हे तुला चांगलेच माहिती आहे, असे म्हणून तुला व तुझ्या कुटुंबातील लोकांना जिवंत राहण्यासाठी ते पैसे मला दिले असे समज म्हणून हाकलून दिल्याचे रमेश जाधव यांनी सदर बझार पोलिसांना सांगितले. त्यांच्या फिर्यादीनुसार अनिल जाधव (रा. सेटलमेंट फ्रि कॉलनी क्र.तीन), सुभाष राठोड, शिवानंद बंडगर (रा. बेलाटी), सचिन पिसे (रा. देशमुख-पाटील वस्ती) आणि सचिन यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला असून सहायक पोलिस निरीक्षक सोळुंके हे पुढील तपास करीत आहेत.
खूनाच्या गुन्ह्यातील
साक्षीदाराच्या वडिलास धमकी
सोलापूर : गामा पैलवान व त्यांच्या साथीदारांविरुध्द कोर्टात साक्ष द्यायला हजर राहिला तर, त्यालापण खल्लास करतो, आमच्या गाडीत हत्यारे आहेत, त्याला गायबच करतो म्हणून पाचजणांनी संजय वलेकर यांना धमकावल्याची फिर्याद अजय वलेकर यांनी जोडभावी पेठ पोलिसांत दिली. त्यानुसार पंकज अनिल काटकर, मिऱ्या कोलते, आकाश चव्हाण, अनिल उर्फ आन्टू मल्लिनाथ कापसे आणि एका अनोळखी तरुणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार श्री. थोरात हे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.