नाट्य व्यवसायिक संघ व नाट्य परिषदेने अनेकदा मागण्या करून, निवेदने देऊनही महापालिका प्रशासनाने सभागृहाच्या भाडेदरात सवलत देणे, मान्य न केल्याने अखेर उद्यापासून कार्यक्रमांना प्रारंभ केला आहे. 26 जानेवारी हा सुटीचा दिवस असल्याने यादिवशीच्या कार्यक्रमांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभतो, याकरीता ता. 26 रोजी दुपारी 1:30 वा. "लावण्यरंग' तर सायं. 6:30 वा. "हास्यकल्लोळ' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोलापूर : मागील वर्षी 21 मार्चला बंद झालेले हुतात्मा स्मृतीमंदिर 14 डिसेंबर रोजी शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाच्यानिमित्ताने हरिनामच्या जय घोषाने दणाणून निघाले होते. आता त्यांनतरही अनेक दिवस बंद असलेल्या हुतात्मा स्मृतीमंदिराचा पडदा उद्या (ता. 26 ) दुपारी लावणी तर सायंकाळी "हास्यकल्लोळ' कार्यक्रमासाठी उघडला जाणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 16 नोव्हेंबरपासून पन्नास टक्के आसन क्षमतेची अट घालून कार्यक्रमास परवानगी दिली होती. शासनाने घातलेल्या या अटीमुळे कलावंत व निर्माते यांना कार्यक्रम सुरू करणे कठीण झाले होते. यासाठी नाट्य व्यवसासिक संघ व नाट्य परिषदेने हुतात्मा सभागृहाच्या भाड्यात सवलत द्यावी, अशी मागणी केली होती. अद्याप महापालिकेने या मागणी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. महापालिका प्रशासन कोणत्याही परिस्थिती भाडे सवलत देत नाही म्हणून आणखी किती दिवस कार्यक्रम बंद ठेवावे. तोटा झाला तरी कलेच्या प्रेमापोटी सहन करू या विचाराने कलावंत व निर्माते यांनी कार्यक्रमाच्या आयोजनास प्रारंभ केला आहे.
नाट्य व्यवसायिक संघ व नाट्य परिषदेने अनेकदा मागण्या करून, निवेदने देऊनही महापालिका प्रशासनाने सभागृहाच्या भाडेदरात सवलत देणे, मान्य न केल्याने अखेर उद्यापासून कार्यक्रमांना प्रारंभ केला आहे. 26 जानेवारी हा सुटीचा दिवस असल्याने यादिवशीच्या कार्यक्रमांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभतो, याकरीता ता. 26 रोजी दुपारी 1:30 वा. "लावण्यरंग' तर सायं. 6:30 वा. "हास्यकल्लोळ' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
संपादन : अरविंद मोटे