'मी कोरोना पॉझिटिव्ह, काय करायचं बोला'; कोरोनाचा रुग्णच समोर उभा ठाकल्याने कर्मचाऱ्यांची धांदल 

I am corona positive, tell me what to do The staff rushed as Coronas patient stand in front of her
I am corona positive, tell me what to do The staff rushed as Coronas patient stand in front of her

मरवडे (सोलापूर) : 'मी कोरोना पॉझिटिव्ह आहे; काय करायचे बोला' असे म्हणत मरवडे (ता. मंगळवेढा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दुपारच्या सुमारास कोरोना पॉझिटिव्ह असलेला रुग्ण आपल्या मुलासह दाखल झाला. साक्षात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णच समोर ठाकल्याने येथे उपस्थित असलेल्या वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबर उपचारासाठी आलेल्या रुग्णांची चांगलीच धांदल उडाली. 
सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य विभागात आदर्शवत सेवा देणारे आरोग्य केंद्र म्हणून मरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ओळखले जाते. वेळोवेळी शासनाकडूनही या आरोग्य केंद्राला विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. चांगली अशीच सेवा मिळत असल्याने मरवडे परिसरातील सर्वसामान्य रुग्णांची वर्दळ या दवाखान्यात असते. आजही सकाळी बाह्यरुग्ण विभाग सुरू झाल्यानंतर तालुक्‍यातील खवे गावातील एक रुग्ण (वय 45) आपल्या मुलासह तेथे दाखल झाला. रुग्ण व मुलाने येथील वैद्यकीय अधिकारी यांची भेट घेत मी सकाळीच बेलापूर येथून आपल्या मूळगावी खवे (ता. मंगळवेढा) येथे आलो आहे. माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आहे, आता माझ्यावर उपचार करा, असे सांगितले. रुग्णाच्या या खळबळजनक विधानानंतर त्या रुग्णाबाबत सविस्तर माहिती विचारली असता आपण बेलापूर येथील एका खाजगी कंपनीत कामाला असल्याचे सांगितले. त्याच्याकडे एका खाजगी लॅबचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. तो रुग्ण सकाळीच बेलापूर येथून एक खाजगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून जवळा (ता. सांगोला) येथे आला व नंतर खवे येथे आला. कोरोना पॉझिटिव्ह असल्याने मुलासह मरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आलो असल्याचे त्याने सांगितले. रुग्णाची खातरजमा केल्यानंतर त्याला व त्याच्या कुटूंबियास सायंकाळी साडेचारच्या सुमारास पुढील कार्यवाहीसाठी मंगळवेढा येथे पाठविण्यात आले. 
याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे यांच्याकडे संपूर्ण साधला असता संबंधित रुग्णाला मंगळवेढा येथे दाखल करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी तालुका प्रशासनाशी बोलावे असे सांगितले. बेलापूर येथे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल असलेला रुग्ण आपल्या मूळ गावीच कसा येतो याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

संपादन : वैभव गाढवे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com