
सोलापूर ः यावर्षी घरगुती उत्सवासाठी आलेल्या गणेश मुर्त्यामध्ये वाहतुकीच्या अडचणीने स्थानिक ठिकाणी तयार केलेल्या गणेश मुर्ती मोठ्या प्रमाणात विक्रीस आलेल्या आहेत. मुर्तीच्या उंचीवरील बंधन लक्षात घेऊन तीन फुटापर्यंत अनेक मुर्त्या अधिक प्रमाणात विक्रीस आल्या आहेत.
गणेशोत्सवाचा सण आता केवळ पाच दिवसावर आला आहे. शनिवारी (ता.22) गणेश उत्सवास सुरूवात होणार आहे. शहरातील सर्वच भागात स्थानिक ठिकाणी दुकानामध्ये गणेश मुर्ती विक्रीस आल्या आहेत. या वर्षी लॉकडाउनच्या अडचणीमुळे वाहतुक काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. तेव्हा सर्वत्रच स्थानिक कलावंतांनी तयार केलेल्या गणेश मुर्त्यांची विक्री होत आहे.
यावर्षी टिळक गणपती, तुळशीबाग गणपती, दगडुशेट हलवाई, बैठा गणपती, बालगणेश, आजोबा गणपती, मंगलमुर्ती, पुणेरी पगडी, लालबागचा गणपती, सिंहावर बसलेला गणपती, शंकरासह गणेश मुर्ती, डमरुवर आसनस्थ गणपती आदी अनेक प्रकारच्या मुर्त्या लक्षवेधी आहेत. यावर्षी पीओपी व शाडु मातीच्या गणपती या दोन्ही प्रकारच्या मुर्त्या उपलब्ध आहेत. पीओपी गणेश मुर्तीची किमंत अगदी दोनशे ते एक हजार रुपयांपर्यत आहेत. शाडु मातीच्या मुर्ती करण्यास लागणारा वेळ व कमी उत्पादन यामुळे त्याच्या किंमती पीओपी मुर्तीच्या तुलनेत दुप्पटीवर आहेत. मात्र पर्यावरण पुरक मुर्ती म्हणून या मुर्त्यांना मागणी जास्त आहे. यावर्षी मिरवणुकीत गणेश मुर्तीचे विसर्जन करता येणार नाही त्यामुळे नागरिक घरीच विसर्जन करण्यास सोपी पडणारी शाडु मातीपासून तयार केलेली गणेशमुर्ती अधिक मागणी करत आहे. पीओपीच्या मुर्तीच्या बाबतीत घरी विसर्जन केले तर मुर्ती विरघळत नाही.
या वर्षी कोरोना संकटामुळे बाजारपेठेत सर्वत्रच सोलापूर शहरात तयार केलेल्या गणेश मुर्त्यां उपलब्ध केल्या गेल्या आहेत. बाहेरगावावरून अगदी तुरळक मुर्ती दिसून येतात. शहरातील सर्वच भागात विक्रेत्यांनी गणेश मुर्तीचे स्टॉल लावले आहेत.
कोरोना संकटाचे सावट
यावर्षी कोरोना संकटामुळे मालाला मागणी किती असेल याचा अंदाज नसल्याने अगदी कमी संख्येने गणेश मुर्ती विक्रीसाठी आणल्या आहेत. ग्राहकांची सध्या मागणी कमी असली तरी पुढील चार दिवसात चांगली विक्री होणार आहे. विसर्जन सोपे व्हावे म्हणून शाडु मातीची मुर्तीची मागणी होत आहे
- प्रितम परदेशी, गणेश मुर्ती विक्रेता
ग्राहकांची अडचण ओळखून उपलब्धता
यावर्षी गणेश मुर्ती विक्री होत असताना कोरोना संकटामुळे ग्राहकांची मागणी लक्षात गणेशमुर्ती विक्रीच्या प्रतिसाद कसा मिळतो हे महत्वाचे ठरणार आहे. आर्थिक अडचण लक्षात घेऊन अगदी कमी किंमतीत देखील मुर्ती ग्राहकांना मिळाव्यात असा प्रयत्न असणार आहे.
- विजयसिंग गुंगेवाले, गणेश मुर्ती विक्रेता
चार दिवसात चांगल्या विक्रीची अपेक्षा
गणेश मुर्ती विक्रीवर कोरोना संकटाचे सावट होते. पण आता बाजारपेठ सुरू झाली आहे. यावर्षी जास्त मुर्ती मागवता आल्या नाहीत. पण येत्या चार दिवसात चांगली विक्री होणार आहे.
लॉकडाउन नसल्याने ग्राहकांना विक्रीसाठी बाजारात येणे शक्य झाले आहे.
- भगवान आगावणे, इशा आर्टस, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.