esakal | लक्षणे असल्यास वेळेत घ्या उपचार ! जिल्ह्यात वाढले 70 रुग्ण; शहरात दोघांचा तर ग्रामीणमध्ये एका महिलेचा मृत्यू 

बोलून बातमी शोधा

1Corona_93_0.jpg}

रुग्णांची स्थिती... 

 • आतापर्यंत शहरातील एक लाख 79 हजार 401 संशयितांमध्ये आढळले 12 हजार 573 पॉझिटिव्ह 
 • एकूण रुग्णांपैकी 11 हजार 494 रुग्ण झाले बरे; आतापर्यंत 664 रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी 
 • आज 677 संशयितांमध्ये 25 जण पॉझिटिव्ह तर दोघांचा मृत्यू; शहरातील 415 रुग्णांवर सुरु आहेत उपचार 
 • ग्रामीणमध्ये पाच लाख 19 हजार 664 संशयितांमध्ये आढळले 40 हजार 846 पॉझिटिव्ह 
 • एकूण रुग्णांपैकी एक हजार 188 रुग्णांचा कोरोनामुळे झाला मृत्यू; 531 रुग्णांवर सुरु आहेत उपचार 
 • आज एक हजार 674 संशयितांमध्ये 45 पॉझिटिव्ह; एका महिलेचा झाला मृत्यू 
लक्षणे असल्यास वेळेत घ्या उपचार ! जिल्ह्यात वाढले 70 रुग्ण; शहरात दोघांचा तर ग्रामीणमध्ये एका महिलेचा मृत्यू 
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : कोरोना काळात लक्षणे असलेल्यांनी वेळेत वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निदान करुन घ्यावे, असे आवाहन सातत्याने केले जात आहे. तरीही, उपचारासाठी उशिरा दाखल झालेल्यांची संख्या लक्षणीय राहिली आहे. आज (शुक्रवारी) शहरातील लक्ष्मी पेठेतील (दमाणी नगर) 61 वर्षीय पुरुषाचा तर गांधी नगरातील 60 वर्षीय पुरुषाचा आणि सिंदखेड (ता. अक्‍कलकोट) येथील 72 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 19, 24 फेब्रुवारीला शहरातील रुग्ण तर 1 मार्च रोजी ग्रामीणमधील महिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाली होती.

रुग्णांची स्थिती... 

 • आतापर्यंत शहरातील एक लाख 79 हजार 401 संशयितांमध्ये आढळले 12 हजार 573 पॉझिटिव्ह 
 • एकूण रुग्णांपैकी 11 हजार 494 रुग्ण झाले बरे; आतापर्यंत 664 रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी 
 • आज 677 संशयितांमध्ये 25 जण पॉझिटिव्ह तर दोघांचा मृत्यू; शहरातील 415 रुग्णांवर सुरु आहेत उपचार 
 • ग्रामीणमध्ये पाच लाख 19 हजार 664 संशयितांमध्ये आढळले 40 हजार 846 पॉझिटिव्ह 
 • एकूण रुग्णांपैकी एक हजार 188 रुग्णांचा कोरोनामुळे झाला मृत्यू; 531 रुग्णांवर सुरु आहेत उपचार 
 • आज एक हजार 674 संशयितांमध्ये 45 पॉझिटिव्ह; एका महिलेचा झाला मृत्यू 

शहरात आज वीरभद्रेश्‍वर नगर, बनशंकरी नगर मिरा नगर (जुळे सोलापूर), जलाराम नगर, रत्नमंजिरी नगर, नेहरु नगर (विजयपूर रोड), माधव नगर, उत्तर सदर बझार, भवानी पेठ, गंगा नगर (लक्ष्मी पेठ), निराळे वस्ती, विकास नगर, लक्ष्मी नगर (देगाव), धोंडिबा वस्ती (रामवाडी), प्रतिक नगर (अवंती नगर), दयानंद कॉलेजवळ, श्रीशैल नगर (भवानी पेठ), आर्यनंदी नगर (पुना नाका), नेहरू सोसायटी (दमाणी नगर), वृंदावन सोसायटी, दक्षिण कसबा, चिंचनगर (मुरारजी पेठ) आणि राघवेंद्र नगर (सैफूल) येथे नवे रुग्ण सापडले आहेत. दुसरीकडे आज ग्रामीण भागात अक्‍कलकोट, मंगळवेढा आणि मोहोळ तालुक्‍यात प्रत्येकी एक, दक्षिण सोलापूर व सांगोल्यात प्रत्येकी दोन, बार्शीत चार, करमाळ्यात सहा, माढ्यात 11, माळशिरसमध्ये नऊ तर पंढरपुरात आठ रुग्ण सापडले आहेत. उत्तर सोलापूर तालुक्‍यात मात्र, एकही रुग्ण आढळला नाही.