esakal | कोरोना : गुढीपाडव्याच्या हारांवर असा झाला आहे परिणाम 
sakal

बोलून बातमी शोधा

Impact of corona virus on Gudipadwa

नववर्षातील पहिल्याच सणाला "कोरोना'ची नजर लागली आहे. त्यामुळे यावर्षी व्यापारीवर्गाची व्यापार करायची परिस्थिती खूपच अवघड झालेली आहे. काही व्यापारी वर्गाचे पोट याच व्यवसायावर आहे.

कोरोना : गुढीपाडव्याच्या हारांवर असा झाला आहे परिणाम 

sakal_logo
By
सुस्मिता वडतीले

सोलापूर : महाराष्ट्रात साजरा होणारा गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. नववर्षाचा पहिला दिवस अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. त्यात गुढीपाडवा म्हटले तर प्रथम साखर आणि खोबऱ्याचे हार डोळ्यांसमोर येतात. बाजारात साखर, खोबरे आणि तिरंगा हार उपलब्ध झाले आहेत, परंतु "कोरोना'मुळे याच हारांना कडवटपणा निर्माण झाला आहे. 
नववर्षातील पहिल्याच सणाला "कोरोना'ची नजर लागली आहे. त्यामुळे यावर्षी व्यापारीवर्गाची व्यापार करायची परिस्थिती खूपच अवघड झालेली आहे. काही व्यापारी वर्गाचे पोट याच व्यवसायावर आहे. "कोरोना'च्या भीतीमुळे त्यांची मनस्थिती अस्वस्थ झाली आहे. बाजारात साखरहार, खोबरेहार, तिरंगा हार आणि कर्नाटकी हार उपलब्ध झाले आहेत. दरवर्षी आठ दिवसांत तयार केलेला माल या दिवसांपर्यंत संपला जातो. परंतु यावर्षी "कोरोना'मुळे माल शिल्लक पडून राहिला आहे. खोबऱ्यांच्या हारांत पाच वाट्यांच्या हारापासून ते 21 वाटींचे हार बनविले जातात. गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी बऱ्यापैकी किमतीत बदल झाला आहे. परंतु "कोरोना'मुळे ग्राहकांची मागणी कमी होत असल्यामुळे व्यावसायिकवर्ग नाराजी व्यक्त करत आहे. 

हारांचे प्रकार किमती 
साखर हार - 80 ते 100 रुपये 
खोबरे हार - 80 ते 240 रुपये 
तिरंगा हार - 40 ते 150 रुपये 
कर्नाटकी हार - 40 ते 80 रुपये 

व्यवसायावर मंदी 
आमच्या इथे दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त तयार केलेल्या हारांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असे. परंतु यावर्षी "कोरोना'मुळे व्यवसायावर मंदी आली आहे. "कोरोना'मुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे, त्यामुळे हारांची मागणी ठप्प झाली आहे. 
- प्रकाश सिद्धे, साखर हार प्रॉडक्‍टर्स