esakal | कोरोना काळात आंदोलन करणे अयोग्य? 'वंचित'च्या आंदोलनाला वारकरी संघटनांचा विरोध 
sakal

बोलून बातमी शोधा

Improper to agitate during the Corona period Warkari organizations opposed the movement of the vanchit bahujan aghadi

कोरोना काळात एक लाख वारकऱ्यांच्या समवेत आंदोलन करणे हे कितपत योग्य आहे, असा सवाल प्रमुख वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेचे सदस्य पांडुरंग महाराज लबडे यांनी उपस्थित केला आहे. 

कोरोना काळात आंदोलन करणे अयोग्य? 'वंचित'च्या आंदोलनाला वारकरी संघटनांचा विरोध 

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : विठ्ठल मंदिर प्रवेशासाठी वंचित बहुज आघाडीने पुकारलेल्या आंदोलनाला अनेक वारकरी संघटनांनी विरोध सुरू केला आहे. दरम्यान, कोरोना काळात एक लाख वारकऱ्यांच्या समवेत आंदोलन करणे हे कितपत योग्य आहे, असा सवाल प्रमुख वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेचे सदस्य पांडुरंग महाराज लबडे यांनी उपस्थित केला आहे. 

दोन दिवसापूर्वीच वारकरी पाईक संघाने या आंदोलना आपला विरोध असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आज समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेने आंदोलनाला विरोध केला आहे. विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलनाला वारकरी संघटनांनीच विरोध केल्याने आंदोलनात किती संख्येने वारकरी सहभागी होतात, या विषयी साशंकता निर्माण झाली आहे. अनलॉक जाहीर केल्यानंतर राज्यातील सर्व मंदिरे खली करावीत, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि विश्व वारकरी संघटनेच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले आहे. 
उद्या (सोमवार) आंदोलन होत असतानाच आज प्रमुख वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेचे सदस्य पांडुरंग महाराज लबडे यांनी वारकरी आंदोलनात सहभागी होणार नाहीत, असे जाहीर केले आहे. कोरोना काळात एक लाख वारकऱ्यांच्या समवेत आंदोलन करणे हे कितपत योग्य आहे, असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे. 

संपादन : वैभव गाढवे