उलटी टांगलेली बाहुली, टाचणी खुपसलेले लिंबू, नारळ, बांगड्या, चोळी-खण..! पांडे गावात खळबळ

Karni
Karni
Updated on

पांडे (सोलापूर) : अंधश्रद्धाविरोधी कायदा होऊनही शहरी व ग्रामीण भागात आजही करनी, भानामती, चेटूक आदी प्रकार घडत असल्याचे दिसून येते. हा प्रकार रात्रीच्या अंधारात अज्ञातांकडून होत असल्याने संबंधित अघोरी प्रकार कोणी केला, हे दिसून येत नाही. असेच प्रकार पांडे (ता. करमाळा) गावात गेल्या चार-पाच दिवसांपासून घडत आहेत. गावातील मध्यवर्ती ठिकाणी व शेतामध्ये टाचणी खुपसलेले लिंबू, उलटी टांगलेली बाहुली, लिंबू, हळदी - कुंकू, नारळ, बांगड्या, चोळी - खण आदी वस्तू आठडाभरात दोन ठिकाणी आढळून येत असल्याने गावात खळबळ उडाली आहे. 

पांडे गावातील शॉपिंग सेंटरच्या गाळ्यासमोर तसेच ज्ञानदेव क्षीरसागर यांच्या शेतामध्ये टाचणी खुपसलेले लिंबू, उलटी टांगलेली बाहुली, लिंबू, हळदी - कुंकू, नारळ, बांगड्या, चोळी - खण आदी वस्तू आठडाभरात दोन ठिकाणी आढळून आल्या आहेत. त्यामुळे अंधश्रद्धा पुन्हा डोके वर काढत असल्याचे दिसून येत आहे. 

गेल्या पाच ते दहा वर्षांपासून गावात देवऋषीचे उतारे बंद झाले होते. परंतु, पुन्हा गेल्या आठवड्यापासून देवऋषीचे उतारे आढळून आले आहेत. ज्ञानदेव क्षीरसागर यांच्या शेतामध्ये हळदी - कुंकू लावून, लिंबूला टाचण्या खुपसलेल्या, शिजवलेला भात, नैवेद्य, उलटी लटकवलेली बाहुली टाचण्या लावून झुडपाला बांधलेली दिसली. तसेच गावातील शॉपिंग सेंटरच्या गाळ्यासमोर हळदी - कुंकू, टाचणी लावले लिंबू ठेवलेले आढळून आले. शेतामध्ये जनावरे चरत असताना टाचण्या असलेले नैवेद्य जनावरांनी खाल्ले तर जनावरांना इजा होऊ शकते. त्यामुळे अशा देवऋषींचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

याबाबत येथील रहिवासी शीतल क्षीरसागर म्हणाल्या, अंधश्रद्धेवर विश्‍वास ठेवून काही जणांकडून गावात अघोरी कृत्ये घडत आहेत. नागरिकांनी अंधश्रद्धेवर विश्‍वास ठेवू नये. आजारी पडल्यास दवाखान्यात जावे. उतारे केल्याने उलट आजार वाढतो व अंधश्रद्धाही वाढते. काढून टाकलेले नैवेद्य खाऊन जनावरांचा बळी जाऊ शकतो. 

असे उतारे काढून टाकल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशी कृत्ये करणाऱ्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ज्ञानदेव क्षीरसागर, सतीश अनारसे, शाहूराव भोसले, आत्माराम रासकर, आजिम मुजावर आदी ग्रामस्थांनी केली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Semi-Constructed Water Tank Poses Severe Threat to Students
Solapur Hotgi Lake IT Park Project To Get 35 Acres Land As 12 Acres Will Be Reserved For Infrastructure Facilities
Railway Project
Solapur ZP School
Marathi News Esakal
www.esakal.com