धक्कादायक! सोलापुरात 32 रुग्णांची वाढ; एकूण कोरोनाबाधित 548

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

सोलापूर शहर व जिल्ह्यातील शुक्रवारी एकाच दिवशी सहा व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर काल शुक्रवारी सायंकाळी पाच ते आज शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत तब्बल 32 नविन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सोलापुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 548 झाली आहे.

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील शुक्रवारी एकाच दिवशी सहा व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर काल शुक्रवारी सायंकाळी पाच ते आज शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत तब्बल 32 नविन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सोलापुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 548 झाली आहे.
आज सकाळी ८ वाजेपर्यंत नव्याने आढळलेल्या 32 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 21 पुरुष आणि 11 महिलांचा समावेश आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 135 अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 103 अहवाल निगेटिव्ह आहेत तर 32 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. सोलापूर शहर व जिल्ह्यात आत्तापर्यंत पाच हजार 329 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यातील चार हजार 781 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 548 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना मुळे आत्तापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला असून 224 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सोलापूर शहर व परिसरात कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आणि कोरोना मुळे मृत पावणार्‍या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An increase of 32 corona patients in Solapur this morning