चॉकलेटला वाढली मागणी परंतु स्टॉकची कमी 

choclate.jpg
choclate.jpg

सोलापूर : लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना चॉकलेट आवडतात. एखादी आनंदाची बातमी शेअर करायची असेल तर आजकाल चॉकलेट देऊन आनंद द्विगुणित करण्याचा ट्रेंड वाढला आहे. सध्या कोरोना व्हायरसमुळे संचारबंदी असून सर्वत्र लॉकडाउन केले असल्यामुळे चॉकलेट दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे मेडिकल आणि जीवनावश्‍यक वस्तूंच्या दुकानातील चॉकलेटचा स्टॉक संपला असल्यामुळे चॉकलेट लव्हर आणि दुकानदारही नाराजी व्यक्त करत आहेत. 
"कुछ मीठा हो जाये' असे म्हणत कोणतेही चांगले काम सुरू करण्याआधी तोंड गोड करण्याची पद्धत आहे. लोकांचा गोड खाण्याकडे जास्त कल असतो आणि चॉकलेट हा त्यांचा आवडता पदार्थ आहे. संपूर्ण जगभरात चॉकलेट हे काम पार पाडते. चॉकलेटला संपूर्ण जगभरात पसंती मिळते. मॉल्स आणि शॉपमध्ये चॉकलेट वेगवेगळ्या शेपमध्ये उपलब्ध असतात. तसेच चॉकलेटची चव आणि प्रकारांमध्ये विविधता आढळून येते. नेहमी बाजारात वेगवेगळ्या चवीच्या चॉकलेटला ग्राहकांची पसंती मिळते, त्यात मॅंगो, पाइनापल, चिकू, ड्रायफ्रूट, हनी चॉकलेट, मिल्क चॉकलेट, चटपटी इमली आदी चव चॉकलेटमध्ये उपलब्ध असतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेकांची कामे ठप्प पडली आहेत. जी कामे सुरू होती, तीही करता येत नसल्यामुळे अनेकजण नाराज आहेत. त्यात सर्वांच्या आवडीचे असणाऱ्या चॉकलेटला नेहमी मोठ्या प्रमाणात मागणी असते. सध्या चॉकलेट लव्हरना तुटवड्यामुळे काहीच करता येत नाही. अनेक चॉकलेट लव्हर चॉकलेट खरेदी करण्यासाठी गल्लीबोळातील शॉप, मेडिकलकडे फिरत आहेत. परंतु चॉकलेटचा स्टॉक संपल्यामुळे ते नाराज होऊन माघारी फिरत आहेत. सध्या जरी बाजारपेठांमध्ये चॉकलेटला सर्वाधिक मागणी असली तरी चॉकलेटचा स्टॉक संपल्यामुळे अनेक चॉकलेट लव्हर नाराज झाले आहेत. वेगानं होणारं शहरीकरण आणि ग्राहकांच्या बदलणाऱ्या आवडीनिवडीमुळे चॉकलेटची भूक वाढताना दिसत आहे. 

पूर्वीच्या चॉकलेट स्टॉकची विक्री झाली
चॉकलेट सर्वांनाच आवडणारे आहे. कोणताही सण-उत्सव न पाहता जेव्हा खाण्याची इच्छा होईल, तेव्हा चॉकलेट खाण्यास प्राधान्य दिले जाते. परंतु सध्या दुकानात चॉकलेट खरेदीसाठी ग्राहक येत आहेत, परंतु पूर्वीच्या चॉकलेट स्टॉकची विक्री झाली आहे. त्यामुळे सर्व माल संपला आहे. चॉकलेट खरेदी करण्यास येणारे ग्राहक रिकाम्या हाती जात आहेत. 
- विनोद बजाज, दुकानदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com