रुग्णांच्या तुलनेत बरे होणारे वाढले ! आज 28 पॉझिटिव्ह तर 56 झाले बरे

तात्या लांडगे
Saturday, 24 October 2020

ठळक बाबी... 

  • शहरातील 89 हजार 785 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात आढळले नऊ हजार 394 व्यक्‍ती आढळले पॉझिटिव्ह 
  • शहरातील 350 पुरुष आणि 175 महिला ठरल्या कोरोनाच्या बळी 
  • आतापर्यंत चार हजार 870 पुरुषांनी तर तीन हजार 464 महिलांनी केली कोरोनावर मात 
  • सद्यस्थितीत शहरातील रुग्णालयांमध्ये 535 रुग्ण घेत आहेत उपचार 

सोलापूर : शहरातील 331 संशयितांमध्ये 20 पुरुषांचा आणि आठ महिलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर सुरवसे नगरातील 84 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात रुग्णांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी केलेल्या ठोस उपाययोजनांमुळे ते शक्‍य होऊ लागल्याचे चित्र आहे.

ठळक बाबी... 

  • शहरातील 89 हजार 785 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात आढळले नऊ हजार 394 व्यक्‍ती आढळले पॉझिटिव्ह 
  • शहरातील 350 पुरुष आणि 175 महिला ठरल्या कोरोनाच्या बळी 
  • आतापर्यंत चार हजार 870 पुरुषांनी तर तीन हजार 464 महिलांनी केली कोरोनावर मात 
  • सद्यस्थितीत शहरातील रुग्णालयांमध्ये 535 रुग्ण घेत आहेत उपचार 

मराठा वस्ती, टिळक चौक (उत्तर कसबा), देगाव नाका, नई जिंदगी, देगाव, कमलसिध्द अपार्टमेंट, आर्यनंदी नगर (वसंत विहार), बंजारा सोसायटी (विजयपूर रोड), पाटील नगर (सैफूल), जुना विडी घरकूल, साहिल नगर, टिळक नगर (मजरेवाडी), पदमांजली अपार्टमेंट (मोदी खाना), गुरुनानक नगर, सलगर वस्ती, न्यू पाच्छा पेठ, गोकूळ नगर (जुळे सोलापूर) आणि मंत्री चंडक नगर (रूपाभवानी मंदिराजवळ) आज नव्या रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत शहरातील पाच हजार 535 पुरुषांना तर तीन हजार 859 महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील चार हजार 870 पुरुषांनी तर तीन हजार 464 महिलांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील 92 संशयित व्यक्‍ती होम क्‍वारंटाईनमध्ये आहेत. तर अवघ्या 60 संशयितांना इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increased healing compared to patients! Today, 28 are positive and 56 are good