रोशेवाडीची पाणी टंचाई संपवण्यासाठी 'तनिष्का' गटाचा पुढाकार

Initiative of Tanishqa group to end water scarcity in Roshewadi
Initiative of Tanishqa group to end water scarcity in Roshewadi
Updated on

करमाळा (सोलापूर) : दरवर्षी तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणाऱ्या रोशेवाडी (ता. करमाळा) गावाची पाणी टंचाई घालवण्यासाठी येथील तनिष्का गटाच्या पुढाकाराने ‘सकाळ रिलिफ फंडा’तुन गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ तहसीलदार समीर माने यांच्या हास्ते झाला.
रोशेवाडी येथील तनिष्का गटाच्या मागणीनुसार येथील तलावातील गाळ काढण्याच्या काम सुरू करण्यात आले आहे. रोशेवाडी गावाला दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. अनेक लोकांना विकत पाणी घ्यावे लागते. महीलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. रोशेवाडी गावाजवळच तलाव असून तलावाच्या खालच्या बाजुला पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. ही तलावाच्या जवळ असून 90 फुट खोल आहे. तरीही गावाला गरजेपुरतेही उन्हाळ्यात पाणी मिळत नाही. याला पर्याय काढण्यासाठी ‘सकाळ’ने पुढकार घेतला आहे. यावेळी यशकल्याणीचे गणेश करे पाटील, जिल्हा परिषद सदस्य बिबिषण आवटे, सरपंच वत्सला अलाट, तनिष्का गट प्रमुख उज्वला शिंदे, तनिष्का सदस्या स्वाती मोरे, अंजु रेगुडे, ज्योती चव्हाण, सरपंच उपसरपंच सचिन शिंदे, माजी रघुनाथ कांबळे, ग्रामसेविका एस. एस. जाधव, कांतीलाल साळुंखे, शिवाजी पवार, पिंपळवाडीचे बापु काळे मान्यवर उपस्थित होते. यावेळी सकाळचे बातमीदार अण्णा काळे यांनी सकाळ माध्यम समूहाची भुमीका समाजावून सांगितली व उपस्थितांचे आभार मानले.
रोशेवाडी येथील तनिष्का गट प्रमुख उज्वला सचिन शिंदे म्हणाल्या, रोशेवाडी गावाला कायमच पाणीपुरवठा करवा लागतो.सकाळ रिलिफ फंडातुन आमच्या गावच्या तलावातील गाळ काढण्याल्याने गावाला पाणी पुरवठा करणा-या विहीराचा पाणीपुरवठा वाढण्यास मदत होणार आहे. या तलावातील गाळ काढल्याने तलावाचा पाणीसाठी वाढण्यासाठी मदत होणार आहे.

तहसीलदार माने म्हणाले, सकाळ माध्यम समूह कायम समाज उपयोगी कामे करणारे दैनिक आहे.रोशेवाडीच्या तलावाच्या खालीच पाणीपुरवठा करणारी विहीर आहे.तलावातील गाळ काढल्याने निश्चित गावाला फायदा होणार आहे. जेवढे ग्रामस्थ सहकार्य करतील तेवढे अधिक सहकार्य सकाळ रिलिफ फंड करेल. शासकीय पातळीवर काही मदत लागली तर आम्ही ही मदत करू. शेतक-यांनी गाळ घेऊन जाण्यासाठी पुढाकार घ्यवा.
यशकल्याणी सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील म्हणाले, समाजात सकाळची खूप मोठी ताकद आहे.त्यांचा काय उपयोग होतो? हे आमच्या कावळवाडी गावांने अनुभवले आहे.मला सरपंच करण्यात तनिष्कांचा मोठा वाटा आहे. तनिष्कांच्या माध्यमातून रोशेवाडी गावच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करता येणार आहे. ग्रामस्थांनी जास्तीत जास्त सहकार्य करून सकाळ रिलिफ फंडातुन गाळ काढण्याच्या उपक्रमाचा लाभ घेतला पाहीजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com