करमाळा तालुक्‍यात बाहेरून आलेल्यांना केले जाणार इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन 

Institutional quarantine will be done for outsiders in Karmala taluka
Institutional quarantine will be done for outsiders in Karmala taluka

करमाळा (जि. सोलापूर) : सध्या मुंबई, पुणे व इतर शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर करमाळा शहर व तालुक्‍यातील ग्रामीण भागात येत आहेत. यापुढे करमाळा तालुक्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र, रेड झोनमधून आलेल्या सर्व नागरिकांना होम क्वारंटाइन न करता फक्त इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांनी दिले आहेत. 
करमाळा येथे पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी हा आदेश दिला असून संबंधितांनी या आदेशाची अंमलबजावणी करावी अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या वेळी तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, मुख्याधिकारी वीणा पवार, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अमोल डुकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अमित निमकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घोगरे उपस्थित होते. ज्योती कदम यांनी सांगितले, की करमाळा तालुक्‍यात तीन ठिकाणी 400 बेडचे कोविड केअर सेंटर तयार करण्यात येणार असून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या मुलींचे वसतिगृहात 200 बेडची सुविधा निर्माण पैकी 50 बेड तयार केले आहेत. उर्वरित महात्मा गांधी हायस्कूल येथे 120 तर अण्णासाहेब जगताप विद्यालय येथे 80 बेड लवकरच तयार करण्याचे नियोजन करण्यात आले. याशिवाय जेऊर येथील ग्रामीण रुग्णालयात 'कोविड हेल्थ सेंटर' तयार करण्यात येणार आहे. करमाळा व जेऊर या दोन्ही ठिकाणी कोविड-19 चे संशयित रुग्णाचे स्वॅब घेण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com