भाषेवर कोणाची मक्तेदारी नसते

अशोक मुरूमकर
Thursday, 27 February 2020

अनेकजण म्हणतात, इतर भाषेत नजाकत आहे. मराठीत नजाकत नाही. पण मी अनेकदा सांगितले आहे, की मराठीतसुद्धा नजाकत आहे. मराठीतसुद्धा तकलू शेर आहे. त्यात प्रत्येक गझलेमध्ये मी माझा शेर वापरतो. प्राचीन काळात तो वापरला जाईच, अगदी त्याचप्रमाणे मी माझ्या गझलेमध्ये वापरतो, तो शेवटी वापरला जातो. 
यावर त्यांनी सादर केलेली माझी गझल...

सोलापूर : मराठी राजभाषा हा सण म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषिक नसूनसुद्धा मराठी भाषेवर माझे प्रेम आहे. मराठी भाषेवर लेखन केले आहे. भाषेवर कोणाची मक्तेदारी नसते. भाषा ही कोणाची एका धर्माची नसते. त्यामुळे भाषेचा आणि धर्माचा काही एकमेकांवर पगडा नसतो, असं बदीऊज्जमा बिराजदार (साबीर सोलापुरी) मानतात. त्यामुळे मराठीत मी लेखन केले. जे काय मी लेखन केले आहे, ते आजपर्यंत मी महाराष्ट्रातील अनेक कविसंमेलने व गझल संमेलनात सादर केले आहे, असे ‘सकाळ’शी बोलताना त्यांनी सांगितले.
अनेकजण म्हणतात, इतर भाषेत नजाकत आहे. मराठीत नजाकत नाही. पण मी अनेकदा सांगितले आहे, की मराठीतसुद्धा नजाकत आहे. मराठीतसुद्धा तकलू शेर आहे. त्यात प्रत्येक गझलेमध्ये मी माझा शेर वापरतो. प्राचीन काळात तो वापरला जाईच, अगदी त्याचप्रमाणे मी माझ्या गझलेमध्ये वापरतो, तो शेवटी वापरला

जातो. 
यावर त्यांनी सादर केलेली माझी गझल... 
मराठी खरी आपली लाज आहे! 
हिच्या वैभवाचा इथे ताज आहे!! 
तुकाराम- ज्ञानेश्‍वरानेच आता; 
हिला चढविलेला असा साज आहे! 
हिला पाहिले मी तिथे पंढरीला; 
मृदंगे अभंगात आवाज आहे! 
मना सज्जनांचेच हे रामदासी; 
मराठीतले हे घरंदाज आहे! 
किती गोड आहे तिची ओढ आहे; 
नको त्याच भाषेस का माज आहे! 
नजाकत मराठीतही सिद्ध झाली; 
इथे भव्य जत्रा बघा आज आहे। 
मराठीच आई खरी साय "साबीर'; 
तुझे नाम घेण्यात का लाज आहे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interaction with Birajdara on the Marathi Language Day