दुचाकीवर दोघे, तीनचाकीत तिघे तर चारचाकीत असावेत चौघेच ! नियम मोडणाऱ्यांना पावणेचार कोटींचा दंड

44791a752e_74b8_48fe_a10f_70f016f96c06.jpg
44791a752e_74b8_48fe_a10f_70f016f96c06.jpg
Updated on

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, या हेतूने पोलिस, महसूल व महापालिका प्रशासनाने वेळोवेळी आदेश काढून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. तरीही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या लक्षणीय राहिली. 7 जुलै 2020 पासून ग्रामीण पोलिस, तहसिल, नगरपालिका, महापालिका प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून तीन कोटी 70 लाख चार हजार 712 रुपयांचा दंड वसूल केला आहे. दंड वसुलीत करमाळा अव्वल असून बार्शी दुसऱ्या क्रमांकावर आहे. माळशिरस, माढा, मंगळवेढा व अक्‍कलकोट तालुक्‍यातही नियम न पाळणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याचे दंड वसुलीवरुन स्पष्ट होते.

ठळक बाबी...

  • 7 जुलै 2020 ते 18 फेब्रुवारी 2021 पर्यंत बेशिस्तांकडून वसूल केला तीन कोटी 70 लाखांचा दंड
  • कोरोना काळात शहर- जिल्ह्यातील दोन लाख 26 हजार 760 जणांनी मोडले नियम
  • नियमांचे उल्लंघन करण्यात करमाळा, बार्शी तालुका अव्वल
  • करमाळ्यातील ग्रामीण भागातून 19.55 लाखांचा दंड वसूल
  • दुसऱ्या क्रमांकावरील बार्शीतून वसूल झाला सहा लाखांचा दंड
  • माळशिरस, माढा, मंगळवेढा, अक्‍कलकोट या तालुक्‍यातूनही सहा लाखांपर्यंत दंड वसूल
  • मास्क न घालणाऱ्यांनी भरला 24 लाख 57 हजार 830 रुपयांचा दंड
  • दुचाकी, तीन व चारचाकी वाहनचालकांकडून वसूल झाला सात लाख 32 हजार 700 रुपयांचा दंड
  • ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत वसूल केला दोन कोटी 92 लाख 45 हजार 240 रुपयांचा दंड
  • शहरात महापालिकेने 36 लाख 33 हजार रुपयांचा दंड वसूल केला


नियमांचे पालन काटेकोरपणे होत नसल्याने पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मास्क न घालणाऱ्यांच्या दंडाची रक्‍कम शंभर रुपयावरुन पाचशे रुपये केली. शहरातही आता पाचशे रुपयांचा दंड आकारला जात आहे. वेळ संपल्यानंतरही दुकान सुरु ठेवणे, दुकानात 60 वर्षांवरील व्यक्‍ती असणे, दुकानात अथवा दुकानासमोर पाचपेक्षा अधिक व्यक्‍ती, होम क्‍वारंटाईन असतानाही त्याचे नियम न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे व थुंकणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे आणि विनामास्क फिरणे, दुचाकीवर तीनपेक्षा अधिक व्यक्‍ती, तीनचाकी वाहनात तीनपेक्षा अधिक तर चारचाकीत चारपेक्षा अधिक व्यक्‍ती असणे, अशा व्यक्‍तींकडून हा दंड वसूल करण्यात आला आहे. दंड वसुलीची आकडेवारी करमणूक कर विभागाने आज एकत्रित प्रसिध्द केली असून त्यावरुन हे चित्र समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com